भारत-इंडोनेशिया सैन्याचा ‘गरुड शक्ती’ संयुक्त सराव

    दिनांक :23-Nov-2022
|
जकार्ता, 
लष्करी विनिमय कार्यक्रमांचा भाग म्हणून, (Indo-Indonesia) भारतीय विशेष दलाच्या तुकड्या सध्या इंडोनेशियातील सांगा बुआना प्रशिक्षण क्षेत्र, करावांग, इंडोनेशिया येथे इंडोनेशियाच्या विशेष दलासोबत ‘गरुड शक्ती’ या द्विपक्षीय संयुक्त प्रशिक्षण सरावात व्यस्त आहेत. ‘गरुड शक्ती’ या शीर्षकाखाली द्विपक्षीय लष्करी सराव मालिकेची ही आठवी आवृत्ती आहे.
 
Indo-Indonesia
 
दोन्ही सैन्याच्या विशेष दलांमधील समज, सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हा या सरावामागील हेतू आहे. या सरावामध्ये विशेष सैन्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी अभिमुखता, शस्त्रास्त्रे, उपकरणे, नवकल्पना, रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धती आणि हाती घेतलेल्या विविध मोहिमांतून शिकलेले धडे, जंगलातील मोहिमा, (Indo-Indonesia) दहशतवादी तळांवर हल्ले तसेच लष्करी सहकार्याला चालना देण्यासाठी दोन्ही देशांच्या जीवनशैली आणि संस्कृतीबाबत अंतर्दृष्टी प्राप्त करण्याखेरीज मूलभूत आणि आगाऊ विशेष सैन्य कौशल्ये एकत्रित करणारा प्रमाणीकरण सरावावरील माहितीची देवाणघेवाण केली जाणार आहे. या संयुक्त प्रशिक्षणात शारीरिक तंदुरुस्ती, रणनीतिक खेळ कवायती, तंत्रे आणि कार्यपद्धती यावरही भर दिला जाईल. यासाठी 13 दिवसांचा सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे. या शिबिराची सांगता 48 तासांच्या वैधता सराव सत्राने होईल.