नागपूरच्या वीज वितरण विभागात मोठी भरती

    दिनांक :23-Nov-2022
|
नागपूर, 
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर (MSPDCL Nagpur) येथे 198 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार ठेवण्यात आलेली आहे. कोपा, वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान इत्यादी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे.

MSPDCL Nagpur
 
या (MSPDCL Nagpur) भरती प्रक्रियेचा भाग होण्यासाठी पात्र उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे इतकी असणे गरजेचे आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे शिथिल असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in ला भेट द्यावी. या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करायची आहे. वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल. ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.