वाहनधारकांवर दहा महिन्यात 2.43 कोटींचा दंड

ग्रामीण पोलिसांची 12,128 प्रकरणी कारवाई
‘यमराज’ ने केले प्रबोधन

    दिनांक :24-Nov-2022
|
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
वाहतूक नियमांचे vehicle owners पालन न करणार्‍यांना त्यातील धोका जाणवून देणे व प्रभावी जनजागृतीसाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवला. त्यात यमराजाच्या वेशभूषेतील कलावंताने वर्दळीच्या रस्त्यांवर उपस्थित राहून वाहतूक नियमांबाबत प्रबोधन केले. वाहतूक नियमांची पायमल्ली करणार्‍यांविरुद्ध जिल्हा ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत 12 हजार 128 प्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यानुसार वेगमर्यादेचे पालन न करणारे, तसेच वाहतूक नियमांची पायमल्ली करणार्‍यांविरुद्ध 2 कोटी 43 लक्ष 27 हजार 500 रूपये इतका दंड लावण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली.
 
vehicle owners
 
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील तिवसा ते अमरावती, त्यानंतर vehicle owners लोणी, मोर्शी, वरूड, पांढुर्णा, मोर्शी ते चांदूर बाजार तेथून परतवाडा, दर्यापूर ते खोलापूर, येवदा, आसेगाव ते परतवाडा, दर्यापूर ते अंजनगाव आणि परतवाडा, राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 नागपूर ते औरंगाबाद, अमरावती ते नांदगाव खंडेश्वर, यवतमाळ, परतवाडा ते धारणी, खांडवा, अमरावती ते चांदूर रेल्वे, धामणगाव व देवगाव या मार्गांवरून मोठी रहदारी होते. त्यातही मोर्शी, वरूड, पांढुर्णा, दर्यापूर, खोलापूर, येवदा, अंजनगाव, परतवाडा, मोर्शी, चांदूर बाजार या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील हे अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा न पाळणार्‍या नागरिकांवर कारवाईसाठी जिल्हा वाहतूक शाखेने इंटरसेप्टर वाहनासह पथके तैनात केली आहेत. त्याचबरोबर, बहुरूपी कलावंताची मदत घेऊन जनजागृतीचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यात यमराजाच्या वेशभूषेतील कलावंताकडून महत्वाचे रस्ते, वर्दळीचे चौक, बाजारपेठा, शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. अपघात टाळण्यासाठी हेल्मेट व vehicle owners सीटबेल्टच्या वापराबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
 
 
ग्रामीण पोलिसांच्या या vehicle owners विशेष मोहिमेत पोलिस अधीक्षक, तसेच अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर, पोलिस अंमलदार दिलीप नांदूरकर, नीलेश तायडे, नीलेश राऊत, सुजीत वानखडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.