भंगार बसेसच्या भरोश्यावर कारभार

लांब पल्लाच्या गाड्या बंद
2014 पासून नवीन बस नाही

    दिनांक :24-Nov-2022
|
- बाळासाहेब सोरगिवकर
चांदूर रेल्वे, 
सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षीत प्रवासाची हमी देणार्‍या scrap buses एसटीची सेवा दिवसेंदिवस मोडकळीस येत आहे. चांदूर रेल्वे एसटी आगाराचा कारभार भंगार बसेसच्या भरोश्यावर सुरू असुन अनेक ठिकाणी बसेस फेल पडत आहे. लांब पल्लाच्या गाड्या बंद झाल्या आहे. 2014 पासून आगाराला एकही नवीन बस मिळाली नाही. स्पेअर पार्टची आगारात कमतरता असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.
 
scrap buses
 
चांदूर रेल्वे आगारात सद्यास 39 बसेस scrap buses असुन चालू स्थितीत 33 बसेस आहे. या 33 बसेसवर 42 शेड्युलचा भार आहे. यामधील 13 ते 14 बसेस 13 लाख किलोमीटरच्यावर धावल्या आहे. ग्रामीण भागात या बसेस धावत असुन शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. या भंगार बसेसमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लांब पल्ल्याच्या शेड्युलमध्ये केवळ औरंगाबाद व बुलढाणा ह्या मार्गावर बसेस धावत आहे. वाशीम, माहूर, अकोला, जळगाव जामोद, दुसरा शेड्युल औरंगाबाद ह्या लांब पल्ल्याच्या बसेस बंद आहे. आगाराचे उत्पन्न दिवसेंदिवस घटत आहे. नादुरूस्त बसेसच्या दुरूस्तीसाठी आवश्यक स्पेअर पार्ट सुध्दा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक नादुरूस्त बसेस आगारात बर्‍याच दिवसापर्यंत उभ्या असतात. एकुणच सुरक्षीत प्रवासाची हमी देणार्‍या बसची सेवा भंगार बसेसमुळे असुरक्षीत होतांना दिसत आहे. वरिष्ठांनी तातडीने याकडे लक्ष देऊन आगारात नवीन बसेस देणे गरजेचे झाले आहे. बंद असलेल्या लांब पल्ल्याच्या scrap buses गाड्या तत्काळ सुरू करण्साची मागणी प्रवाशांतून होत आहे.
 
 
आठ वर्षांपासून नवीन बस नाही
2014 मध्ये महाराष्ट्रात भाजप व शिवसेना युतीची सत्ता होती. त्यानंतर 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची महाविकास आघाडीची सत्ता होती. त्या काळातही एसटीच्या ताफ्यात नवीन scrap buses बसेस आल्या नाहीत. तीन महिण्यापूर्वी सत्तेत बसलेल्या फडणविस व शिंदे सरकाराने नवीन बसेस खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र तेही लबाडाचे आमंत्रण तर ठरणार नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
 
दहा नवीन बसेसची आवश्यकता
बसेसच्या scrap buses कमतरतेमुळे लांब पल्ल्याचे शेड्युल बंद आहे. चांदूर रेल्वे आगाराला 10 नवीन एसटी बसेसची आवश्यकता असुन त्याकरिता वरिष्ठ स्तरावर मागणी केलेली आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक पवन देशमुख यांनी दिली.