आकांक्षा असनारे करणार भारताचे प्रतिनिधीत्व

    दिनांक :24-Nov-2022
|
तभा वृत्तसेवा
अमरावती,
राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे प्रतिवर्षी Akanksha Asanare आयोजित करण्यात येणार्‍या युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत बांगला देशाकडून प्राप्त आमंत्रणानुसार स्थानिक विद्याभारती महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि 4 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनची सिनियर अंडर ऑफिसर आकांक्षा असनारे Akanksha Asanare हिची निवड झाली आहे. 12 ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये हा कार्यक्रम बांगला देशात आयोजित करण्यात आला असून भारताचे प्रतिनिधीत्व करणार्‍या छात्र सेनेच्या दलात निवड झालेली ती महाराष्ट्र राज्यातील एकमेव महिला कॅडेट आहे.
 
Akanksha Asanare
 
बांगलादेशात 16 डिसेंबर रोजी साजरा केल्या जाणार्‍या विजय दिवस कार्यक्रमात ती Akanksha Asanare राष्ट्रीय छात्र सेनेची कॅडेट म्हणून हजेरी लावणार आहे. स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची विधी शाखेची ती अंतिम वर्षाची विद्यार्थिनी असून ती माहे डिसेंबर मध्ये दिल्लीहून प्रस्थान करेल. तिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल 4 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.