अमेरिकन व्हिसा तीन वर्षे लांबणीवर

    दिनांक :24-Nov-2022
|
नवी दिल्ली, 
अमेरिकेला भेट देणे असल्यास आता तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. American visa बी-वन (व्यापार व्हिसा) आणि बी-टू व्हिसा (पर्यटक) प्राप्त करण्याचा कालावधी एक हजार दिवस इतका आहे. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार, व्यापार/पर्यटक व्हिसाच्या मुलाखतीसाठी मुंबईत 999 दिवस प्रतीक्षा (वेटिंग) करावी लागणार आहे. हैदराबादेत 994 दिवस, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 961 दिवस, चेन्नईमध्ये 948 दिवस आणि कोलकाता येथे 904 दिवस प्रतीक्षा करावी लागेल. अमेरिकेत काम करणार्‍या भारतीयांना आपल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी भारतात येणे असल्यास त्यांना व्हिसावर व्हेरिफिकेशन असा शिक्का मारावा लागतो. आता त्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
 
 
American visa
 
या संदर्भात दिल्लीतील अमेरिकन दूतावासाच्या अधिकार्‍याने सांगितले की, American visa व्हिसासंबंधी प्रतीक्षा मोठ्या कालावधीची असली तरी कुणी घाबरता कामा नये. व्हिसासाठी सातत्याने अर्ज करावा. यातील अर्जांची चाळणी जितक्या वेगाने होईल, तितका प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे. असे झाल्यास कोणत्याही शुल्काशिवाय मुलाखत देता येणार आहे. दरम्यान, मागील सप्टेंबरमध्ये अमेरिका भेटीत परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना व्हिसा उशिराचा मुद्दा आपले समकक्ष अँटनी ब्लिंकेन यांच्या समक्ष उपस्थित केला होता. तसेच, मागील आठवड्यात अमेरिकन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही प्रकि‘या 2023 मध्ये सामान्य स्थितीवर येण्याची शक्यता आहे. जगातील अन्य देशांत बी-वन आणि बी- टू व्हिसाप्राप्तीसाठी प्रतीक्षा कालावधी सरासरी दोन महिन्यांपेक्षाही कमी असतो.