एम्बोलोच्या गोलने स्वित्झर्लण्ड विजयी

    दिनांक :24-Nov-2022
|
दोहा, 
फिफा विश्वचषकात अल जनाब स्टेडियमवर झालेल्या सामन्यात Brill Embolo ब्रील एम्बोलोने 48 व्या मिनिटाला नोंदविलेल्या एकमेव महत्त्वपूर्ण गोलच्या जोरावर स्वित्झर्लण्डने कॅमेरूनवर 1-0 ने विजय मिळविला. संघर्षपूर्ण ठरलेल्या ग गटातील साखळी सामन्यात युरोपियन संघ स्वित्झर्लण्डने चेंडूवर 51 टक्के, तर आफ्रिकन संघ- कॅमेरूनने 49 टक्के ताबा मिळविला होता. मात्र पूर्वार्धात कॅमेरूनने स्वित्झर्लण्डची चांगली दमछाक केली, त्यामुळे मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा राहिला.
 
 
BREEL-EMBOLO
 
परंतु उत्तरार्धात कॅमेरूनच्या सिंहाचे आक‘मण व ऊर्जा मर्यादित करून स्वित्झर्लण्डने सुरेख डावपेच आखले. माफी मागणार्‍या Brill Embolo ब्रील एम्बोलोने आपल्या जन्माच्या देशाविरुद्ध 48 व्या मिनिटाला विजयी गोल केला. झेर्डन शाकिरी क्रॉस पासवर त्याने हा गोल केला. 25 वर्षीय ब्रील एम्बोलोचा जन्म याऊंडे येथे झाला होता, परंतु तो बासेलमध्ये लहानाचा मोठा झाला. पूर्वार्धात कॅमेरूनची स्थिती चांगली होती, परंतु कार्ल टोको एकाम्बी, एरिक-मॅक्सिम व मार्टिन होन्ग्ला या सर्वांनी चांगल्या संधी गमावल्या, परंतु उत्तरार्धात स्विर्त्झण्डने आपल्या कामगिरीत बरीच सुधारणा केली आणि एम्बोलोच्या सुरेख गोलमुळे त्यांनी आघाडी घेतली. रुबेन वर्गासने दुसरा गोल करण्याची उत्कृष्ट संधी वाया घालविली.