फ्रान्सवर मात करून भारत उपांत्य फेरीत

    दिनांक :24-Nov-2022
|
- जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धा

जेरुसलेम, 
येथे सुरू असलेल्या फिडे जागतिक सांघिक Chess tournament बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताने रोमहर्षक टायब्रेकरमध्ये फ्रान्सचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने फ्रान्सवर 3-1 असा विजय मिळविला व टायब्रेकरमध्ये 2.5-1.5 अशा फरकाने बाजी मारली. निहाल सरीन व एस. एल. नारायणनने अनुक्रमे ज्युल्स मॉसार्ड व लॉरेन्ट फ़्रेसिनेटवर विजय मिळवून सामन्याचा कल भारताच्या बाजूने झुकविला.
 
 
VIDIT-GUJARATHI
 
Chess tournament : भारताचा अव्वल खेळाडू विदित गुजराथी याने फ्रान्सचा अव्वल खेळाडू मॅक्झिम वॅचियर-लाग्राव्हला 45 चालींमध्ये बरोबरीत रोखले, तर अनुभवी के. शशिकिरणला मॅक्सिम लगार्डेने 55 चालींमध्ये पराभूत केले, परंतु सरीन व नारायणन यांच्या विजयाने भारताने मुसंडी मारली. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना उझबेकिस्तानशी होणार आहे. याआधी दोन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात गुजराथीने लॅग्राव्हवर विजय मिळवला व नारायणनने फ़्रेसिनेटचा पराभव केला. सरीन आणि शशिकिरण यांच्या लढती बरोबरीत राहिल्यामुळे भारताचा 3-1 असा विजय निश्चित झाला. उझबेकिस्तानने युक्रेनविरुद्ध पहिला सामना 3-1 असा जिंकला आणि टायब्रेकमध्ये 2.5-1.5 ने बाजी मारीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पेन व अझरबैजान यांच्या दरम्यानचा पहिला सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. पोलंडने चीनवर विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली.