बोम्मई न्यायालयाहून मोठे नाहीत, आमचा भाग आम्हाला मिळणारच

    दिनांक :24-Nov-2022
|
- देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
 
मुंबई, 
कर्नाटक सीमा प्रश्नासाठी आम्ही सर्व पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून, सर्वोच्च न्यायालय यावर योग्य निर्णय घेईल. न्यायालयापेक्षा कुणीच मोठे नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईदेखील नाहीत. आमचा भाग आम्हाला मिळणारच आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्री DCM Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला. याबरोबरोबरच पक्षाचा वाद कोणीही सीमा प्रश्नात आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते.
 
 
Bommai- Devendra Fadnavis
 
महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही आणि आमचा सीमा भाग आम्हाला परत मिळेल. बेळगाव, निपाणी आणि कारवार हा आमचा भाग आहे. ही आमची भूमिका आहे. आम्ही ती न्यायालयात मांडली आहे. कायद्याच्या चौकटीत आम्ही मागणी केली आहे. परंतु, यात कोणीही राजकारण आणू नये. या पूर्वी सर्वांत जास्त काळ कर्नाटक आणि महाराष्ट्रातही काँग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार होते. परंतु, त्यांच्याकडून हा प्रश्न सुटला नाही. तो सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. सीमा प्रश्नावरून कोणीही राजकारण करू नये. प्रत्येकाने याबाबत विचार करून बोलले पाहिजे. आजपर्यंत पक्षाचा वाद सीमावादात आणला नाही. सीमा भागासाठीचा आपला लढा सुरूच राहील, असे DCM Devendra Fadnavis  फडणवीस यांनी म्हटले आहे.
 
 
फडणवीस यावेळी यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावरही मत व्यक्त केले. उदयनराजे भोसले यांनी आज गुरुवारी पंतप्रधानांना याबाबतचे पत्र पाठले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची भूमिका मांडली. परंतु, या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत आहेत. त्यांच्यावरून कोणताही वाद होऊ शकत नाही. याबरोबरच या विषयावरून राजकारण देखील करता येणार नाही. परंतु, शरद पवार बोलले की, उद्धव ठाकरे यांना बोलावच लागते, असा टोला DCM Devendra Fadnavis  देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.