आता वृक्षच देईल स्वत:ची माहिती!

*वनमंत्री मुनगंटीवारांनी केले ‘क्यूआर कोडचे’ लोकार्पण

    दिनांक :24-Nov-2022
|
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
झाडाची संपूर्ण माहिती, (QR Code) त्याचे उपयोग आदी बाबी जाणून घेण्यासाठी चंद्रपूर येथील वन प्रबोधनीने अभिनव उपक्रम राबवून झाडांचा ‘क्यूआर कोड’ विकसित केला आहे. या ‘क्यूआर कोड’चे लोर्कापण राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Forest Minister Mungantiwar) यांच्या हस्ते वन प्रबोधनी परिसरात करण्यात आले. या माध्यमातून आता झाडच स्वत:ची सविस्तर माहिती स्वत: देईल. ‘टॉकिंग ट्री’ म्हणजे बोलणारे झाड, असा हा नाविण्यपूर्ण उपक्रम आहे.
 
QR Code
 
या (QR Code) उपक्रमांतर्गत चंद्रपूर वन प्रबोधनीच्या परिसरातील विविध प्रजातींची झाडे भ्रमणध्वनीद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून ओळखता येणार आहेत. तसेच प्रत्येक प्रजातीची सविस्तर माहिती दृकश्राव्य माध्यमातूनही उपलब्ध होणार आहे. वन प्रबोधनी परिसरातील प्रत्येक झाडावर पाटी स्वरुपात हे ‘क्यूआर कोड’ लावण्यात येणार आहे. ‘टॉकिंग ट्री’ या मोबाईल अ‍ॅपद्वारे ही प्रक्रिया केल्यानंतर संबंधित झाडच स्वत:बद्दल विविध भाषांमध्ये माहिती देणार आहे.
 
 
वन प्रबोधनी परिसरात मोठ्या प्रमाणात वन व वनेत्तर प्रजातींची झाडे असून, या पध्दतीने परिसरातील जैव विविधतेबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेणे शक्य होणार आहे. या (QR Code) ‘क्यूआर कोड’चे लोकार्पण केल्यानंतर (Forest Minister Mungantiwar) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विसापूर येथे तयार होणार्‍या ‘बॉटनिकल गार्डन’मध्येही वन विभागाने हा उपक्रम राबवावा. तसेच या उपक्रमाचा विस्तार गंगोत्रीप्रमाणे करण्यासाठी वन विभागाने नियोजन करावे. झाडावर ‘क्यूआर कोड’ची अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल वनमंत्र्यांनी प्रबोधनीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांचे अभिनंदन केले.
 
 
यावेळी (QR Code) प्रधान मुख्य संरक्षक शैलेश टेंभुर्णे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक जितेंद्र रामगावकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, मंगेश इंदापवार आदी उपस्थित होते.