आता लक्ष्य साधता येईल : मोरियासू

    दिनांक :24-Nov-2022
|
दोहा : गेल्या चार वर्षांपासून केवळ मीच नाही, तर जपानच्या खेळाडूंनी रशिया फुटबॉल विश्वचषकातील वेदना सहन केल्या आहेत. मात्र यंदाच्या विश्वचषकात सलामीच्या सामन्यात बलाढ्य जर्मनीवर विजय मिळविल्याने आत्मविश्वास वाढला आहे. जर आमच्या खेळाडूंनी आपल्या क्षमतेनुसार कामगिरी केली प्राण पणाला लावले ,तर निश्चितच चांगले निकाल येतील व लक्ष्य साधता येईल. हे घडण्यासाठी मला संघाचे उत्तम व्यवस्थापन व काळजी घ्यावी लागेल, असे जपान फुटबॉल संघाचे प्रशिक्षक Hajime Moriyasu हाजीमे मोरियासू म्हणाले.
 

MORIYASU 
 
जपानला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवायचे आहे, हेच आपले ध्येय असल्याचे Hajime Moriyasu मोरियासू यांनी विश्वचषकासाठी कतारला रवाना होण्यापूर्वी सांगितले होते. बुधवारी चार वेळचा विश्वविजेत्या संघावर विजय मिळविल्यामुळे त्यांना लक्ष्य गाठण्याची आशा निर्माण झाली आहे. 1998 मध्ये विश्वचषकात पदार्पण केल्यापासून जपानचा संघ कधीही अंतिम आठमध्ये पोहोचला नाही, परंतु चार वर्षांपूर्वी रशियामध्ये ते अंतिम आठच्या जवळपास पोहोचले होते. रविवारी जपानचा पुढील सामना कोस्टा रिकाशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळविला, तर ते बाद फेरीच्या एक पाऊल जवळ जातील. पहिल्या सामन्यात विजय मिळाल्याने सर्वकाही नाही. मी आपल्या खेळाडूंना आत्मसंतुष्ट होऊ देणार नाही, असे मोरियासू म्हणाले.