स्टेडियमच्या स्वच्छतेबद्दल जपानच्या चाहत्यांचे कौतुक

    दिनांक :24-Nov-2022
|
दोहा : फिफा विश्वचषकात बुधवारी आशियाई संघ Japan Stadium जपानने माजी विश्वविजेत्या जर्मनीवर जबरदस्त विजय नोंदविल्याने त्यांच्या फुटबॉल चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मात्र या आनंदाच्या भरात त्यांनी आपली परंपरा सोडली नाही किंवा कोणताही उन्माद केला नाही. उलट सामना संपल्यावर सर्व प्रेक्षक खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम स्टेडियम सोडून बाहेर गेले, तेव्हा जपान संघाच्या चाहत्यांनी स्टेडियमची साफसफाई केली.
 
 
SAYSUKA
 
साफसफाईसाठी मागे थांबलेल्या जपानी चाहत्यांना बघून अनेकांना आश्चर्य वाटले, परंतु जपानी लोकांसाठी ती सामान्य बाब होती. स्टेडियम रिकामे होण्यास सुरुवात होताच, जपानी समर्थक हलक्या निळ्या डिस्पोजेबल कचरा पिशव्या बाहेर काढताना दिसले. त्यांच्या या स्वच्छता अभियानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. आम्हाला जाणीव आहे की लोक Japan Stadium जपानी चाहत्यांना विश्वचषक स्टेडियम स्वच्छ करताना बघत आहेत, परंतु हे आम्ही प्रसिद्धीसाठी करीत नाहीत, असे जपान समर्थक सायसुका म्हणाली. तुम्हाला जे विशेष वाटते ते आमच्यासाठी सामान्य आहे, असेही ती म्हणाली.