चांदूर रेल्वेत उद्यापासून कबड्डी स्पर्धा

राज्यभरातून खेळाडू शहरात दाखल
जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाचे आयोजन

    दिनांक :24-Nov-2022
|
तभा वृत्तसेवा
चांदूर रेल्वे, 
चांदूर रेल्वे शहरात मदनगोपाल Kabaddi Tournament मुंधडा महाविद्यालयाच्या (अशोक महाविद्यालय) प्रांगणावर जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळ, चांदूर रेल्वे तर्फे भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले असून, याची जय्यत तयारी मंडळातर्फे करण्यात आली आहे. राज्यभरातील खेळाडू चांदूर रेल्वे शहरात दाखल झाले आहे.
 
Kabaddi Tournament
 
मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या वतीने धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रात दरवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर कबड्डी, व्हॉलीबॉल व कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कोविड काळामुळे मागील दोन वर्ष सदर Kabaddi Tournament क्रीडा उत्सव मंडळ राबवू शकले नाही. यंदा पुन्हा एकदा सदर स्पर्धा होत आहे. यंदो हे 17 वे वर्ष आहे. तीन दिवस क्रीडा रसिकांना मेजवानी असून स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. 8 ते 10 हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी उभारण्यात आली आहे. या स्पर्धेत पुरुषांचे 30 संघ व महिलांचे 15 संघ असे एकूण 45 संघ राज्यभरातून सहभागी होणार आहे. काही राज्याबाहेरील खेळाडू सुद्धा येणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुरुष विभागामध्ये प्रथम पारितोषिक रोख 55 हजार 555 रुपये व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर चषक देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक रोख 33 हजार 333 रुपये व नीराज चोप्रा चषक तसेच तृतीय पारितोषिक रोख 22 हजार 222 रुपये व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे.
 
 
याशिवाय महिला विभागामध्ये Kabaddi Tournament प्रथम पारितोषिक रोख 35 हजार 333 रुपये व मीराबाई चानू चषक देण्यात येणार आहे तर द्वितीय पारितोषिक रोख 25 हजार 222 रुपये व मेरी कॉम चषक तसेच तृतीय पारितोषिक रोख 15 हजार 111 रूपये व पी. व्ही. सिंधू चषक देण्यात येणार आहे. याशिवाय वैयक्तिक बक्षिसांची भरपूर लयलूट होणार असून मॅन ऑफ द सिरीज पुरुष व महिलांकरिता स्पोर्ट सायकल, मॅन ऑफ द फायनल पुरुष व महिलांकरिता होम थिएटर व मॅन ऑफ द सॅटर्डे पुरुष व महिलांकरिता मोबाईल देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सहभागी संघांना आकर्षक बक्षीस व प्रोत्साहनपर बक्षिसे तसेच खेळाडूंसाठी वैयक्तिक रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनात जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य अथक परिश्रम घेत आहे.
 
 
महर्षी उत्तम स्वामीजी करणार उदघाटन
सदर Kabaddi Tournament स्पर्धेचे उदघाटन श्री श्री महामंडलेश्वर 1008 महर्षी उत्तम स्वामीजी महाराज यांच्या हस्ते होणार असून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. तसेच उदघाटनावेळी देशभक्ती गीतगायन, आदिवासी नृत्य, भव्य आतिषबाजी, नेत्रदीपक रोषनाई, विविध खेळांचे प्रात्यक्षिक, विविध खेळाडूंची उपस्थिती हे आकर्षण राहणार आहे.