महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का?

    दिनांक :24-Nov-2022
|
- भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आघाडीला सवाल

मुंबई 
राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची आवई उठवल्यानंतर आता 44 खेडी कर्नाटकला दिली जाणार असल्याच्या धादांत खोट्या बातम्या पसरवणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का? असा खडा सवाल भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते Keshav Upadhyay केशव उपाध्ये यांनी गुरुवारी उपस्थित केला. काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नेतृत्वाच्या नाकर्तेपणामुळेच बेळगाव महाराष्ट्रात येऊ शकले नाही, असा आरोपही त्यांनी केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्याच्या पाठोपाठ अक्कलकोट तालुक्यातील गावांचा समावेश कर्नाटकमध्ये करण्याबाबत विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरून विरोधी पक्षाने भाजपवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत आघाडीवर टीकास्त्र सोडले.
 
 

Keshav Upadhyay dfggh
 
बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग महाराष्ट्रात सामील करावा यासाठी लढा देणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतृत्व केलेल्या ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या मी एस.एम. या आत्मचरित्रातील सीमा लढ्याविषयीच्या प्रकरणाचा उल्लेख Keshav Upadhyay उपाध्ये यांनी यावेळी केला. आपल्या आत्मचरित्रात एस.एम. जोशी यांनी काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाच्या  नाकर्तेपणामुळे सीमा प्रश्न सुटला नाही, असे अनेक उदाहरणे देऊन दाखवून दिले आहे. एकही गाव कर्नाटकला दिले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तरीही महाविकास आघाडीचे नेते कर्नाटक महाराष्ट्राची खेडी पळविणार असल्याचा अपप्रचार करीत आहे, असा आरोप Keshav Upadhyay उपाध्ये यांनी केला. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग पळवले जात असल्याचा खोटा प्रचार महाविकास आघाडीने केला होता. मात्र हा खोटेपणा तत्काळ उघडा पडला. आता कर्नाटक महाराष्ट्राची खेडी पळवणार असल्याची आवई उठवली जात आहे. या घटनांतून महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारीच घेतली आहे असे दिसते. या या विषयावर राजकारण करून महाविकास आघाडीने आपला संकुचितपणाच दाखवून दिला आहे, अशी टीका त्यांनी केली.