दवबिंदू होऊन ये तू ...मंगेश पाडगावकर!

Mangesh Padgaonkar फुल तृणातील इवले...

    दिनांक :24-Nov-2022
|
ऊन सावली
- गिरीश प्रभुणे
Mangesh Padgaonkar सहज बोलायचीच भाषा! साधे शब्द. मनाला भुरळ पाडणारे! मनात गुंजन करणारी भावरम्य कविता! मंगेश पाडगावकर यांची. मराठी मनाशी एकरूप झालेली कविता! Mangesh Padgaonkar आकाशवाणीच्या काळात हातातली कामं करता करता पाडगावकर कसे मनात शिरायचे कळायचं नाही. Mangesh Padgaonkar ते वयच तसं होतं. झुलायचं... फुलायचं... झोपाळ्यावरचं... झोपाळ्या वाचून झुलायचं... काय व्हायचं कळायचं नाही. दिवस दिवस गाण्याच्या शब्दाच्या मागे फुलपाखरासारखं उडत रहायचं...! Mangesh Padgaonkar
थरारे कोवळी, तार...सोसेना सुरांचा भार,
फुलांनी जखमी करायचे, मोजावी नभांची खोली ! Mangesh Padgaonkar
घालावी शपथ ओली, श्वासात चांदणे भरायचे...
 
 

mangesh 
 
 
Mangesh Padgaonkarआपण आपल्यातच दंग होण्याचं वय... कशातच लक्ष नसायचं. नभांची खोली मोजता मोजता... मन उगाचंच हळवं व्हायचं. ओल्या शपथांच्या वारुळातून हुळहुळत मुंग्या... फुलपाखरं आणि मग अश्रूच्या सरसर सरीवर सरी... का असं व्हायचं... प्रेम... प्रेमाचं वय... तशा प्रेमाचं वयच नव्हतं... बोरं... चिंचा ... आवळे... चिमणीच्या दातांनी खायचे आणि एकमेकांना द्यायचे...
या ओठांनी चुंबुनी घेईन हजारदाही माती, अनंत मरणे झेलुनी घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे...Mangesh Padgaonkar
पिंपळाचा तो पार... त्याची ती पानांची ओढाळ सळसळ... पुस्तकात जपून ठेवलेलं ते पिंपळ पान हळूहळू आरपार जाळीदार बने. त्याची ती नाजूक वीण त्यातून बघता बघता हरवून जायला व्हायचं... या जन्मावर या जगण्यावर इथल्या मातीवर प्रेम करणारी कविता...! Mangesh Padgaonkar
रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली 
सहा ऋतुंचे सहा सोहळे येथे भान हरावे, आयुष्याला सप्तरंगी बनविणारा काळ... मनाच्या कुपीतलं... अत्तर कधीच उडून न जाणारं... पाडगावकर वेडं करायचे...! भातुकलीचा खेळ... ते चिमणखडे... शंख... शिंपले... गजगे... आणि झप झप... खेळाची गजगे साऽऽ ई सुट्टयो...Mangesh Padgaonkar
 
 
 
 
 
तसं कशातच काही नसायचं... सारंच बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात... आणि ते करुण रसात ओथंबलेलं गीत लागायचं...
राजा बदला मला समजली शब्दांवाचून भाषा...माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा...! Mangesh Padgaonkar
का राणीच्या डोळा तेव्हा दाटूनी आले पाणी...
भातुकलीच्या खेळाचं हे गाणं... सा-या जीवनाचं कारुण्य भरलेलं... बघता बघता भातुकलीचा खेळ खराखुरा बनतो आणि वास्तवातला खेळ कधी भातुकलीचा बनतो कळतही नाही... अन् असा हळवा कोपरा प्रत्येकाच्या मनात जपलेला असतो.
वाèयावरती विरून गेली एक उदास विराणी....! Mangesh Padgaonkar
असं जरी कवी म्हणाला तरी उदासीनता मनाला व्यापून राहते. ही विराणी विरून जाताना आपली मुद्रा कायमची कोरून जाते. पाडगावकरांचे शब्द हे अर्थ- ताल- लय याच्याबरोबरच एक आतला भाव घेऊन येतात. गंध घेऊन येतात. पाडगावकर आणि आपण एकरूप होऊन जातो... आपण आपले राहत नाही. आणि कविता पाडगावकरांची राहत नाही. आपली आपली खास आपलीच बनते. Mangesh Padgaonkar
शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातूनी...लाज-या माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा,
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा, भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा...!
 
 
 
शुक्रता-याचे शीतल चांदणं या चांदण्यासारखीच ही कविता. पाडगावकरांच्या या कवितेने त्याच्या स्वरांनी सारं जीवनच भारून गेलं. काट्याकुट्याच्या जीवनाच्या वाटेत मंद गंधिते फुलांचा वर्षावच सुरू झाला. भारलेल्या स्वप्नवत क्षितिजाकडे वाटचाल सुरू झाली... पाडगावकरांच्या या गीतांनी... Mangesh Padgaonkar होरपळलेल्या मनाला पालवी फुटली. वाकला फांदीवरी आता फुलांनी जीव हा...अहाहा... फुलांच्या ओझ्यानं नाजूक ओझ्यानं वाकलेल्या गंधित फांदीप्रमाणे हा जीव बहरून येऊन वाकलाय... बा... कसलं हे ओझं! आयुष्यभर वागवावं असं फुलायचं! या ओझ्यानं मन फुलपाखरांसारखं उडू लागतं. Mangesh Padgaonkar बालपण ज्या कवितेने भारलं... ज्या गाण्यानं बालपणाला आकार दिला. Mangesh Padgaonkar पाडगावकरांनी अशा असंख्य कविता आपल्याला दिल्या. ''सांग सांग भोलानाथ'' परंपरागत नंदी बैलाला बालमनाचं अंगडं टोपडं घालून आलेलं गीत गेली चाळीस-पन्नास वर्षे भुरळ घालतंय... आता क्वचितच दिसणारा भोलानाथ पाडगावकरांनी अमर केला.
 
 
सांगा कसं जगायचं...कण्हत कण्हत की गाणं म्हणत...? Mangesh Padgaonkar
काट्या सारखं, सलायचं...की फुलासारखं फुलायचं...
तुम्हीच ठरवा...!
असं म्हणत निराशेतून सहज बाहेर काढणारी कविता... वयाबरोबर आपल्याला त्या त्या भूमिकेत समजून जगायला लावणारे पाडगावकर प्रेमात हळुवारपणे चिमटे घेत गुदगुदल्या करीत आपल्याला खुलवतात. Mangesh Padgaonkar
प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आपलं सेम असतं...
क्षणात दोन विषयातील अंतर संपविणारी कविता... सर्व काळचा कवी...!
गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे,
असे फुल प्रीती म्हणजे, कधी हाय वाटे Mangesh Padgaonkar
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती... असफल प्रेमाचे इतके सुरेख हृदयाला भिडणारे गीत...! पाडगावकरांच्या भाव कविता या सतत मनात डोकावतं राहतात. ‘जिप्सी'नं सा-यांना वेडं केलं होतं.
जरि तुझीया सामर्थ्याने, ढळतील दिशाही दाही, Mangesh Padgaonkar
मी फुल तृणातील इवले, उमलणार तरीही नाही.
 
 
असं ठामपणे म्हणणारं तृणाचं पानं ते केवढं, स्वच्छंदी स्वतःच्या मार्गानं जीवन जगणारं त्यालाही स्वतःचं मत आहे. त्याची जीवन शैली आहे. त्याला नियमात बांधू पाहणा-या शक्तीला हा संदेश आहे. म्हटलं तर सर्वांसाठीची कविता आहे. पण शिक्षकांना-पालकांना हा खास संदेश आहे. Mangesh Padgaonkar
जिंकतील मला दवबिंदू , जिंकील तृणाचे पाते
अन् स्वतःस विसरून वारा, जोडीला रेशमी नाते
कुरवाळीत येतील मजला, श्रावणातील जलधारा
सळसळून भिजली पाने, मज करतील सजल इशारा Mangesh Padgaonkar
शोधीत धुक्यातून मजला, दवबिंदू होऊन ये तू
कधी भिजलेल्या मातीचा, मृदु सजल सुगंधित हेतू।
तू तुलाच विसरुनी यावे, मी तुझ्यात मज विसरावे...
कशी सर्वशक्तिमान समजणा-याला बालरूपात स्वतःच्याच रूपात पाहणारा कवी. तू तुलाच विसरुनी यावे...Mangesh Padgaonkar केवढे सर्व अस्त्रांवर शस्त्रांवर मात करणारे हे शब्द... आपणही दवबिंदूसम होऊन त्याच्यात सामावून जातो... आपण आपले आणि तो त्याचा रहात नाही. कोण कुणाला अर्घय देतोय. पाडगावकर असे सहज जीवनाचं सार... मर्म सुचवून जातात. कवीचं मन हे अखेरपर्यंत फुलासारखं कोमल-मृदु-दवबिंदूसारखं सर्वस्व बहाल करून ज्याच्या सहवासात येईल त्याच्याशी समरसून जाणारं... Mangesh Padgaonkarअसे पाडगावकर आपल्याच मनाच्या छायेसारखे आपले आपणास  शोधणारे...!