शपथ, हे फक्त भारतातच शक्य आहे!

Mass Conversion ११ जोडप्यांचे बौद्ध धर्मात धर्मांतरण

    दिनांक :24-Nov-2022
|
वेध
- नंदकिशोर काथवटे
Mass Conversion हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून त्यांच्या देवी-देवतांची अवहेलना करणे, हे फक्त भारतातच शक्य आहे. सर्वधर्म समभावाची शिकवण फक्त स्वार्थी लोकांच्या बोलण्यात दिसून येते. Mass Conversion मात्र, हिंदूंच्या भावना जपण्याचा प्रयत्न काही स्वार्थी लोक व राजकारणी करीत नाहीत, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अमोल मिटकरींसारख्या जबाबदार नेत्यानेसुद्धा जाहीर सभेत आपल्या भाषणातून ब्राह्मण समुदायाचा अपमान केला आहे. Mass Conversion एखाद्या धर्माची गोष्ट पटत नसेल तर त्याने ती करू नये. त्याला ते करण्यासाठी कुणाकडून जबरदस्तीदेखील केली जात नाही. मात्र, हिंदू काही संस्कार, धार्मिक विधी जर हिंदू धर्म मानणारे पाळत असतील तर इतरांच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही. Mass Conversion मात्र, भारतात मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे फाजील कारण पुढे करीत हिंदूंच्या भावना दुखावण्याची संधीच संधिसाधू लोक बघत असतात. Mass Conversion हिंदू धर्मातील सण, उत्सव आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखाविण्याची एकही संधी सोडली जात नाही.
 
 

mm 
 
 
Mass Conversion हिंदूंचे उत्सव साजरे करायचे, दिवाळीत आतषबाजी करून नवीन कपडे घालून दिवाळसण थाटात साजरा करायचा; मात्र त्याचवेळी हिंदूंच्या लक्ष्मीपूजनाचा विरोध करायचा, गणपती विसर्जन मिरवणुकीत डिजेच्या तालावर ताल धरत मौज करायची; मात्र त्याच विघ्नहर्त्याच्या पूजेला विरोध करीत गणपतीला देव मानण्यास नकार द्यायचा, Mass Conversion दुर्गादेवीच्या उत्सवात नटूनथटून गरबा-दांडिया खेळायचा आणि त्याच दुर्गादेवीची आराधना करणा-या हिंदूंच्या भावना दुखवायच्या, कृष्ण जन्माष्टमीला दहीहंडीच्या स्पर्धेत सामील होऊन हंडी फोडायची आणि त्याच कृष्णाच्या लीलांना थोतांड सांगत पालनहार विष्णूवर आपला विश्वास नसल्याचे सांगायचे. Mass Conversion खरेच हे फक्त आणि फक्त भारतातच शक्य आहे. नेमके आज या विषयावर लिहिण्याचे कारणही तितकेच गंभीर आहे. Mass Conversion राजस्थानमधील भरतपूर येथील एका सामूहिक विवाह सोहळ्यात जोडप्यांना हिंदुविरोधी शपथ देण्यात आल्याचा लाजिरवाणा प्रकार उजेडात आला आहे.
 
 
११ जोडप्यांना सामूहिक विवाह सोहळ्यात शपथ देताना Mass Conversion ‘मी ब्रह्मा-विष्णू-महेश आणि गणेश यांना मानणार नाही; त्यांची पूजा करणार नाही,' अशी शपथ देण्यात आली. या ११ ही जोडप्यांचे बौद्ध धर्मात धर्मांतरण करण्यात आले. त्यानंतर त्या सर्व विवाहित जोडप्यांना शपथ देताना, ‘ब्रह्मा-विष्णू-महेश यांना देव मानणार नाही; त्यांची पूजा करणार नाही. राम आणि कृष्णाला ईश्वर मानणार नाही, Mass Conversion  गौरी-गणपती वगैरे हिंदू धर्मातील कोणत्याही देवीदेवतांवर विश्वास ठेवणार नाही व त्यांची पूजा करणार नाही. परमेश्वराने अवतार घेतला, यावर माझा विश्वास नाही. हा सारा प्रकार खोटारडा आहे,' अशा आशयाची शपथ सामूहिक विवाह सोहळ्यातून जोडप्यांना घ्यायला लावणे, हे कितपत संयुक्तिक आहे. Mass Conversion या सा-या प्रकारावर विश्व हिंदू परिषदेने तीव्र आक्षेप घेत आयोजकांवर कारवाईची मागणी केली आहे. २० नोव्हेंबर रोजी भरतपूरच्या कुम्हेर परिसरात संत रविदास सेवा समितीतर्फे या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. Mass Conversion ज्या संताचे नाव लावून ही समिती स्थापन झाली आहे, त्या समितीला संतांच्या शिकवणीचाही विसर पडला आहे. Mass Conversion कुठल्याही संतांनी कोणाच्याही धर्माचा विरोध न करण्याची शिकवण दिली आहे.
 
 
मात्र, हिंदू धर्माच्या उत्सवांचा, सणांचा, त्यांच्या धार्मिक विधींची वेळोवेळी खिल्ली उडविली जाते. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. हिंदूंच्या देवी-देवतांना कुणाला मानायचे नसेल तर नका मानू, त्यांच्या देवांवर विश्वास नसेल तर नका ठेवू; याकरिता कुणाचीही जबरदस्ती नाही. मात्र, जाहीरपणे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असतील तर त्या सहन तरी कशा करायच्या? इतर धर्मांच्या विधीविरोधात, त्यांच्या ईश्वराविरोधात कधीही हिंदू धर्मातील लोक आक्षेप घेत नाहीत. त्यांच्या देवतांविरोधात काहीच बोलत नाही. मात्र, हिंदूंच्या देवी-देवतांवर, त्यांच्या धार्मिक कार्यांवर आक्षेप घेण्याचा अधिकार या उप-यांना कुणी दिला? भारतात सर्वधर्मीयांच्या भावनांचा आदर केला जातो. त्यांना त्यांच्या धार्मिक कार्यात हिंदुधर्मीय लोक कधीच अडथळे आणत नाहीत किंवा  त्यांच्या चालीरीतीवर कधीच आक्षेपही नोंदवित नाही. मग इतरांनासुद्धा हिंदूंच्या देवी-देवतांबद्दल का आक्षेप असावा. भारताला आपण हिंदू राष्ट्र म्हणवतो आणि त्याच राष्ट्रातील  हिंदूंच्या देवी-देवतांची अवहेलना करतो. असा प्रकार एकदाच नाही तर अनेकदा जाणूनबुजून केला गेला आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात जाहीरपणे qहदूंच्या धार्मिक भावना दुखाविणा-या आयोजकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले गेले पाहिजे, ही रास्त अपेक्षा!
९९२२९९९५८८