शिक्षणाचा केरळ पॅटर्न स्वीकारताना...!

New Education Policyमातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य

    दिनांक :24-Nov-2022
|
अग्रलेख
New Education Policy गत काळात शैक्षणिक क्षेत्रात नको तितके बदल केले गेले. ते करू नये, अशा सूचना वारंवार या क्षेत्रातील जाणकारांकडून केल्या गेल्या. त्याचे परिणाम योग्य नाही, असे इशारेही देऊन झाले होते. New Education Policy पण त्याकडे ‘हम करे सो कायदा' अशा हेकेखोर वृत्तीने वागणा-यांनी दुर्लक्ष केले. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करू नये, हा त्याच पठडीतील निर्णय होता. New Education Policy त्याबद्दलही शिक्षणतज्ज्ञांनी आणि पालकांनीही नाराजी व्यक्त केली होती. असे सरसकट उत्तीर्ण करण्याचे उफराटे धोरण शिक्षणाच्या आणि राज्याच्या मुळावर उठेल, असेही सांगून झाले होते. पण तो सल्लाही केराच्या टोपलीत टाकला गेला. त्यामुळे व्हायचे तेच झाले. New Education Policy शैक्षणिक क्षेत्रात कोरोना काळानंतर महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा केरळ Kerala, राजस्थान Rajsthan, पंजाब Punjab आदी राज्यांच्या तुलनेत खालावल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागात केरळ पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
kerala
 
New Education Policy केरळसोबतच राजस्थान आणि पंजाबच्या शिक्षणातील यशस्वी प्रयोग राज्यात राबवून शिक्षण आणि शिक्षार्थी या दोघांचेही ‘चांगभलं' करण्याच्या शिंदे - फडणवीस सरकारच्या धोरणाचे अभिनंदनच करायला हवे. यानिमित्ताने शिक्षण क्षेत्राची प्रयोगशाळा करणा-यांचा धिक्कारही केला जायला हवा. New Education Policy वेळीच निष्कर्ष निघाला, त्याबरहुकूम राज्यातील शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी विविध राज्यांचे दौरे केले; तेथील शिक्षणाच्या पद्धती जाणून घेतल्या आणि आपण कुठे कमी पडतोय्, हे लक्षात येताच संबंधितांना कुठे सुधारणा करणे आवश्यक आहे, हे पटवून दिले. New Education Policy मंत्र्यांनीही ते मनावर घेतले आणि योग्य ते बदल करण्यास शिक्षण विभागाला अनुमती दिली. ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब' या प्रघाताला बगल देणाराच हा निर्णय म्हणायला हवा. New Education Policy येत्या काळात तसे बदल शैक्षणिक क्षेत्रात होतील आणि शिक्षणात माघारलेला महाराष्ट्र पुन्हा आपल्या स्थानी जाऊन बसेल, असे मानायला हरकत नसावी.
 
 
 
 
 
 
 
New Education Policy क्षेत्र कुठलेही असो त्यात वारंवार प्रयोग केल्याने आजार बरा व्हायचा सोडून रुग्ण बेजार होण्याचीच स्थिती उद्भवते. आता शिंदे-फडणवीस सरकारकडूनही वारंवार शैक्षणिक क्षेत्रात बदल न करण्याची अपेक्षा आहे. New Education Policy नव्या केरळ पॅटर्ननुसार प्राथमिक शाळा चालविण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना तर माध्यमिक शाळा चालविण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला मिळणार आहेत. असे अधिकार मिळाल्याने स्थानिक स्तरावर गरजेनुसार विषयांची निवड करण्याची संधी राहणार आहे. New Education Policy उगाच बोजड विषय घेऊन विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्याऐवजी त्यांच्या मनातील भीती काढण्यासाठी सोपे आणि सहज पचनी पडणारे विषय निवडल्याने आनंदी शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळू शकेल. केरळ पॅटर्ननुसार प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जाणार आहे. New Education Policy यातून विद्यार्थ्यांचे बौद्धिक कौशल्य तपासले जाणार असून विद्यार्थी मागे का पडतोय् किंवा त्याची मागे पडण्याची कारणे कोणती, हे ध्यानात येणार आहे. शिक्षकांना कोणत्या उपाययोजना केल्यास विद्यार्थी अभ्यासात पुढे जातील, हे ठरविणे यामुळे सहजसाध्य होणार आहे.
 
 
New Education Policy विद्यार्थीही मासिक सराव परीक्षेमुळे पुस्तकांपासून पळ काढू शकणार नाहीत. या पॅटर्नमध्ये कमी गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा पर्यायही दिला जाणार आहे. New Education Policy यातून परीक्षेदरम्यान कुठल्याशा कारणाने अनुपस्थित राहिलेले विद्यार्थी, घरच्या सण-समारंभांमुळे अथवा कुठल्या दुःखद घटनेमुळे परीक्षेला मुकलेल्या विद्याथ्र्यांना एकदम नापास होण्याची भीती राहणार नाही. अभ्यासात मागे राहिलेले विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊन चांगले गुण घेऊ शकणार आहेत. New Education Policy हा निर्णय विद्यार्थी हिताचा आणि शिक्षणाबाबतची अढी दूर करणारा ठरू शकतो. याचे दूरगामी परिणाम दिसून येतील, यात शंकाच नसावी. गेल्या काही वर्षांत असे आढळून आले आहे की, वर्षानुवर्षे शालेय अभ्यासक्रम बदललेच जात नाहीत किंवा गरज नसताना ते बदलले जातात. New Education Policy खरे तर ते काळानुरूप बदललेच जायला हवेत. पण ही प्रक्रिया शिक्षकांचे आणि शिक्षण क्षेत्राचे काम वाढवणारी असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण नव्या पॅटर्ननुसार दर १० वर्षांनी सर्व विषयांचे अभ्यासक्रम बदलले जाणार आहेत. New Education Policy अभ्यासक्रम बदलताना ताजेपणा, सामिप्य, वैविध्य, व्यवहार्य, कुतूहल, प्रयोगशील आदी गुणांचा विचार करून विषयांची निवड होईल, याची काळजी घेतली जायला हवी.
 
 
हसत खेळत शिक्षणाचे अनेक प्रयोग शिक्षणात केले जाऊ शकतात. New Education Policy शाळांमध्ये व्यक्तिमत्त्व विकासाची शिबिरे घेतली जाऊ शकतात. लेखन-वाचनाचे कौशल्य विद्यार्थ्यांनी ग्रहण करावे म्हणून काही प्रयोगांची हेतुपुरस्सर आखणी केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांच्या पाठीवर केवळ दप्तराचे ओझे वाढू नये म्हणून त्यांना खेळांकडे कसे वळवता येईल, त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्पर्धात्मक प्रयोग कसे साकारता येतील, याचाही विचार व्हायला हवा. New Education Policy केरळ पॅटर्ननुसार विभागीय स्तरावर कला आणि विज्ञान मेळावे घेतले जातात. तसे आपल्याकडेही विज्ञान मेळावे होतात. पण ते अनिवार्य नसल्याने ज्या शाळांमध्ये विज्ञान शिक्षक अ‍ॅक्टिव्ह असतील, त्या शाळांचेच विद्यार्थी अशा मेळाव्यांमध्ये सहभागी होतात. इतरांना विज्ञान कशाशी खातात, याचा गंधही नसतो. New Education Policy त्याचप्रमाणे कला मेळावेही विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना देणारे ठरू शकतात. निसर्गत:च मुलांमध्ये कुठल्या ना कुठल्या कला दडलेल्या असतात. अशा मेळाव्यांमधून विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक गुणांनाही चालना मिळू शकते.
 
 
शाळा-शाळांमध्ये अभ्यास मंडळांचे गठण अनिवार्य केले जायला हवे. New Education Policy त्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जायला हवेत. यातून नवनेतृत्व तयार होण्यास हातभार लागू शकतो. चित्रकला हा एक विषय आहे; ज्यात सार्वत्रिक सहभाग मिळू शकतो. चित्रकलेतून विद्याथ्र्यांची निरीक्षणशक्ती वाढते आणि ती पुढच्या आयुष्यात कामाला येते. New Education Policy कविकट्ट्यांची स्थापना, वादविवाद स्पर्धांसाठी विद्याथ्र्यांना सज्ज करणे, प्रश्नमंजूषा, भित्तीपत्रके असे कितीतरी उपक्रम शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या नावांना उजाळा देण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. New Education Policy  निरनिराळ्या ऑलिम्पियाडमधील सहभाग विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त करून देऊ शकतात. असे प्रयोगात्मक उपक्रम अभ्यासेतर गतिविधींमध्ये समाविष्ट होऊ शकतील का, याचाही प्रयत्न व्हायला हवा. New Education Policy शहरी शाळांमध्ये यातील अनेक उपक्रम राबविलेही जात असतील, पण त्यात आलेला तोच तो पणाही दूर केला जायला हवा. नव्या युगाच्या मागणीनुरूप उपक्रमांमध्ये बदल घडवून आणला जायला हवा.
 
 
केरळमध्ये मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्राधान्य दिले जाते. New Education Policy ही बाब तर आपल्याकडील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी कितीतरी आधी सांगितली असून त्याबाबत शासनाला आर्जवही केलेला आहे. पण आंधळे इंग्रजी प्रेम आणि मातृभाषेबद्दल तिरस्काराच्या भावनेमुळे महाराष्ट्रात हा प्रयोग राबविलाच गेला नाही. New Education Policy केरळातील १०० टक्के साक्षरतेची ही गुरुकिल्ली आपणही वापरायलाच हवी. केरळ पॅटर्ननुसार तसा प्रयोग राबविला जाणार असेल तर त्याचे त्रिवार स्वागत व्हायला हवे. कोणतीही गोष्ट आपल्याला इतर भाषांमधून शिकण्याऐवजी मातृभाषेतून समजणे सहजसुलभ असते. मातृभाषेतील संदर्भ स्थानिक असल्याने मुलेही शिकण्याचा कंटाळा करीत नाहीत. New Education Policy काही शैक्षणिक सर्वेक्षणांनीही मातृभाषेतील शिक्षणामुळे होणा-या लाभांवर प्रकाश टाकलेला आहे. मातृभाषेतील कविता, श्लोक, गाणी बालमनावर दूरगामी परिणाम करणा-या ठरतात, हे सिद्धही झाले आहे.
 
 
 
New Education Policy मध्यंतरी ‘पाण्याची घंटा' असा प्रयोग सुरू झाला होता. आरोग्याच्या दृष्टीने फलदायी ठरणारा हा प्रयोग प्रत्येक शाळेसाठी अनिवार्य केला जायला हवा. New Education Policy अनेक शाळांमधील स्नेहसंमेलने रटाळ आणि मुलांमधील लढाऊ बाणा संपवणारी असतात, हे लक्षात आले आहे. या पृष्ठभूमीवर स्नेहसंमेलनांमध्ये राष्ट्रीय बाणा, राष्ट्रीय प्रतीके, राष्ट्रीय प्रथा-परंपरा, राष्ट्रपुरुष, राष्ट्रसंत यांच्याबाबत जागरूकता निर्माण करणारी असतील, याची दक्षता घेतली पाहिजे. New Education Policy मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग चेतविण्याचे कामही केलेच जायला हवे. New Education Policy एकंदरीत केरळ पॅटर्न स्वीकारताना त्यात नसलेल्या घटकांचाही अभ्यासांती राज्याच्या अभ्यासक्रमात समावेश केला जायला हवा.