भारत जोडो यात्रेला राजस्थानात आव्हान !

Rahul Gandhi गुर्जरांची नाराजी काँग्रेसला परवडणार नाही

    दिनांक :24-Nov-2022
|
दिल्ली वार्तापत्र
- श्यामकांत जहागीरदार
Rahul Gandhi काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ३ डिसेंबरला राजस्थानात प्रवेश करणार आहे. दक्षिण भारतातील राज्यात आणि महाराष्ट्रातही या यात्रेला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. Rahul Gandhi आतापर्यंत ज्या ज्या राज्यांतून यात्रेचा प्रवास यशस्वीपणे झाला, त्यातील सर्व राज्ये ही गैरकाँग्रेसशासित होती. Rahul Gandhi या सर्व राज्यात काँग्रेसच्या या यात्रेला फारसे आव्हान मिळाले नाही; मात्र आता काँग्रेससमोर सर्वात मोठे आव्हान या यात्रेला राजस्थानातून सुखरूप बाहेर काढण्याचे राहणार आहे. Rahul Gandhi देशात काँग्रेसची सत्ता असलेली इनमीन जी अडीच राज्ये आहेत, त्यातील एक राजस्थान आहे. काँग्रेसशासित दुसरे राज्य छत्तीसगड आहे. झारखंडमध्ये झामुमोसोबत काँग्रेसचे सरकार आहे. म्हणजे या राज्यात काँग्रेसची अर्धी सत्ता आहे, असे म्हणायला हरकत नाही. Rahul Gandhi झारखंड आणि छत्तीसगडमध्ये भारत जोडो यात्रा जाणार का, ते माहीत नाही. Rahul Gandhi मात्र, गुर्जर समाजाचे नेते विजयqसह बैसला यांनी दिलेल्या धमकीमुळे काँग्रेसशासित राजस्थानात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
 
 

gandhi 
 
 
 
सचिन पायलट यांना काँग्रेसने मुख्यमंत्री केले नाही तर आम्ही राजस्थानात Rahul Gandhi राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला घुसू देणार नाही, अशी धमकी गुर्जर नेते विजयसिंह बैसला यांनी दिली आहे. गुर्जर मुख्यमंत्री घेऊन यात्रा राजस्थानात आली तर आम्ही तिचे स्वागत करू, असेही बैसला यांनी म्हटले. Rahul Gandhi गुर्जर समाजाने आपली ही धमकी प्रत्यक्षात आणली तर भारत जोडो यात्रा संकटात सापडू शकते. या पेचप्रसंगातून दिल्लीतील आणि राजस्थानातील काँग्रेस नेते कसा मार्ग काढणार, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. Rahul Gandhi सचिन पायलट गुर्जर समाजाचे आहेत. आम्ही सचिन पायलट यांना आमदार राहण्यासाठी निवडून दिले नाही, तर मुख्यमंत्री होण्यासाठी निवडून दिले, असे बैसला यांनी म्हटले. Rahul Gandhi गुर्जर आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी राज्य सरकारने जो समझोता आमच्यासोबत केला, त्याचीही पूर्तता राज्य सरकारने केलेली नाही, असा त्यांचा आरोप आहे. Rahul Gandhi विजयसिंह बैसला हे गुर्जर समाजाचे नेते किरोडीमल बैसला यांचे पुत्र आहेत आणि ते गुर्जर समाजाचे राजस्थानातील ज्येष्ठ काँग्रेस नेते नेते राजेश पायलट यांचे पुत्र सचिन पायलट यांची लढाई लढत आहेत.
 
 
राजस्थानात मुख्यमंत्रिपदावरून जो गुंता निर्माण झाला, त्यावर काँग्रेस नेतृत्वाला अद्याप तोडगा काढता आलेला नाही आणि नजीकच्या काळातही तोडगा काढता येईल, असे वाटत नाही. Rahul Gandhi या वादावर सर्वमान्य तोडगा निघणे शक्य दिसत नाही. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, तर अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रिपद सोडायचे नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाची स्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर' अशी झाली आहे. Rahul Gandhi पायलट यांना खूश केले म्हणजे मुख्यमंत्री केले तर अशोक गहलोत नाराज होतात आणि गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावर कायम ठेवले तर पायलट दुखावले जातात. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाची अडचण होत आहे. Rahul Gandhi राजस्थानात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक असल्यामुळे काँग्रेसमधील दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच काँग्रेसचे नेतृत्व असहाय आणि अगतिक झाले आहे. या मुद्यावरून राजस्थानात काँग्रेसमध्ये बरीच नाटके आणि तमाशेही झाले. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात त्याचा ताजा प्रयोगही झाला होता. Rahul Gandhi सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठी अशोक गहलोत यांना राजस्थानच्या बाहेर काढून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची तयारी काँग्रेस नेतृत्वाने केली होती. Rahul Gandhi पण हा प्रयत्न अशोक गहलोत यांनी अतिशय हुशारीने हाणून पाडला आणि आपले मुख्यमंत्रिपद कायम ठेवले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राजस्थानमध्ये आमदारांचे बहुमत गहलोत यांच्या पाठीशी आहे.
 
 
पायलट यांना अतिशय कमी आमदारांचा पाठींबा आहे. Rahul Gandhi कमी आमदारांचा पाठींबा असल्यामुळे पायलट यांना मुख्यमंत्री होता येत नाही, त्याचप्रमाणे आमदारांना घेऊन काँग्रेस पक्षातून बाहेरही पडता येत नाही. काँग्रेसमधून बाहेर पडत आपला नवा गट वा पक्ष स्थापन करण्यासाठी पायलट यांना किमान दोनतृतीयांश आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. सद्यस्थितीत पायलट यांच्यासोबत एकतृतीयांशही आमदार नाहीत. Rahul Gandhi त्यामुळे हा वाद चिघळला आहे. सप्टेंबर महिन्यात अशोक गहलोत गटाने सचिन पायलटच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेतृत्वाविरुद्ध उठाव केला होता. त्यावेळी या वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाने तेव्हाचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे आणि अजय माकन यांना निरीक्षक म्हणून जयपूरला पाठविले होते. Rahul Gandhi गहलोत गटाने तेव्हा या दोघांनाही जुमानले नाही. या दोघांनी दिल्लीत येऊन आपला अहवाल सादर केला तसेच गहलोत गटाच्या तीन नेत्यांवर कारवाईची शिफारस केली. तेव्हा निरीक्षक म्हणून जयपूरला गेलेले खडगे आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. Rahul Gandhi मात्र, या तीन नेत्यांवर कारवाई करण्याची हिंमतही आतापर्यंत काँग्रेसच्या नेतृत्वाला झाली नाही. उलट यापैकी एका नेत्यावर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी राजीनामा दिला. Rahul Gandhi माकन यांच्या राजीनाम्यानंतर गहलोत गटाच्या त्या नेत्याला यात्रेच्या जबाबदारीपासून दूर करण्यात आले असले, तरी माकन यांची नाराजी काही दूर झालेली नाही.
 
 
 
काँग्रेसचे नेतृत्व गहलोत यांना हात लावायला तयार नाही. Rahul Gandhi कारण, गेल्या काही वर्षांत ते काँग्रेसचे अघोषित खजिनदार झाले आहेत. निवडणुका लढवण्यासाठी वा पक्ष चालवण्यासाठी जो पैसा लागत असतो तो पैसा राजस्थानातून येत आहे. याच कारणामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीची जबाबदारी गहलोत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. काँग्रेस नेतृत्व गहलोत यांना हटवायला तयार नसले, तरी राजस्थानात गहलोत हटावची मागणी पायलट गटाकडून सातत्याने केली जात आहे. Rahul Gandhi  विशेष म्हणजे अशी मागणी नुकतीच गहलोत गटाच्या एका मंत्र्याने करून राजस्थान काँग्रेसमध्ये सर्वकाही ठीक नाही, हे दाखवून दिले. पायलट यांना मुख्यमंत्री केले नाही तर राज्यातून काँग्रेसचे अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला. पण काँग्रेस नेतृत्व आपल्या डोळ्यांवर कातडे ओढून बसले आहे. काँग्रेसने राजस्थान विधानसभेची निवडणूक जेव्हा जेव्हा गहलोत यांच्या नेतृत्वात लढवली, तेव्हा तेव्हा राज्यात काँग्रेसचा पराभव झाला, असे पायलट गटाकडून सांगितले जात आहे. Rahul Gandhi यासाठी २००३ आणि २०१३ च्या विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला जात आहे. या दोन्ही निवडणुका काँग्रेसने गहलोत यांच्या नेतृत्वात लढवल्या होत्या आणि त्यात काँग्रेसचा पराभव झाला होता. Rahul Gandhi २००३ मध्ये काँग्रेसला २१ तर २०१३ मध्ये ६० जागा मिळाल्या होत्या.
 
 
२०१८ ची विधानसभा निवडणूक काँग्रेसने प्रदेश अध्यक्ष असलेल्या सचिन पायलट यांच्या नेतृत्वात लढवली होती. Rahul Gandhi त्यावेळी काँग्रेसला राज्यात बहुमत मिळाले. त्यामुळे त्यावेळी मुख्यमंत्रिपदावर पहिला अधिकार हा सचिन पायलट यांचा होता. मात्र, ऐनवेळी ‘आयत्या बिळावर नागोबा'प्रमाणे अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्रिपद पटकावले. तेव्हापासून पायलट नाराज आहेत. याआधीही एकदा त्यांनी बंड केले, पण पुरेशा संख्येत आमदार त्यांच्यासोबत नसल्यामुळे त्यांचे हे बंड फसले होते. Rahul Gandhi अशोक गहलोत गुर्जर समाजाचे अन्य एक मंत्री अशोक चांदना यांच्या माध्यमातून सचिन पायलट यांना शह देण्याचा प्रयत्न करीत असतात. चांदना यांच्यानंतर गुर्जर समाजाच्याच शकुंतला रावत यांनाही मंत्री करण्यात आले. Rahul Gandhi पण हे दोघेही पायलट यांच्या पासंगाला पुरत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत पायलट यांनी संपूर्ण गुर्जर समाज हा काँग्रेसच्या पाठीशी उभा केला होता. काँग्रेसचे ८ आमदार गुर्जर समाजाचे होते तर भाजपाचा एकही आमदार गुर्जर समाजाचा नव्हता. Rahul Gandhi २०१८ मध्ये राजस्थानात काँग्रेसला सत्तेवर आणण्यात सचिन पायलट आणि गुर्जर समाजाची मोठी भूमिका होती, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे गुर्जर समाजाची नाराजी काँग्रेसला परवडणारी नाही. गुर्जर समाज रस्त्यावर आला तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला राज्यात पळता भुई थोडी होईल. Rahul Gandhi त्यामुळे काँग्रेसला राजस्थानातील पायलट-गहलोत वादावर लवकरात लवकर सर्वमान्य तोडगा काढावा लागणार आहे.
९८८१७१७८१७