राष्ट्रवादी काँग्रेस मधून मोठ्या नेत्याचा राजीनामा!

    दिनांक :24-Nov-2022
|
मुंबई,  
राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेमन यांनी पक्ष सोडला आहे. Resignation NCP त्यांनी आपल्या ट्विटद्वारे ही घोषणा केली आहे. पक्षाचे सदस्यत्व सोडण्याची घोषणा करत त्यांनी शरद पवार यांचेही आभार मानले.त्यांनी पक्षापासून वेगळे होण्यामागे वैयक्तिक कारणे सांगितली.
 
rgf
 
आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'माझ्या 16 वर्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये Resignation NCP असताना मला आदर आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार जी यांचे आभार. वैयक्तिक कारणांमुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्यत्व सोडत आहे. माझ्या शुभेच्छा पवार साहेब आणि पक्षाला सदैव आहेत.