भारताची अर्थव्यवस्था भक्कम; रशिया युद्धाचा परिणाम नाही

    दिनांक :24-Nov-2022
|
- परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीचे मत
 
नवी दिल्ली, 
काही महिन्यांपासून चाललेल्या Russia-Ukraine War रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कमी प्रमाणात परिणाम असेल, असे मत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. बैठकीत परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. सूत्रांनुसार, रशिया-युक्रेन युद्धाचा जगावर विपरित परिणाम होणे शक्य असून, त्याच्या झळा दीर्घकाळापर्यंत सोसाव्या लागणार आहे.
 
 
economy fgh
 
परंतु, मजबूत भारतीय अर्थव्यवस्थेवर मात्र त्यांचा परिणाम कमी प्रमाणात दिसून येईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी समितीच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपातील युद्धाबाबत उझबेकीस्तान देशात मागील सप्टेंबरमध्ये झालेल्या एससीओ शिखर संमेलनात भारताच्या वतीने व्यक्त केलेल्या मतांवर समाधान व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना उद्देशून आजचे युग युद्धाचे नाही, असे वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे मोदींच्या याच मतांवर बाली (इंडोनेशिया) येथील जी-20 शिखर संमेलनात चर्चा झाली होती. दरम्यान, बैठकीत अनेक सदस्यांनी Russia-Ukraine War युद्धामुळे युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली. याशिवाय रशियाकडून इंधन खरेदी आणि युक्रेनशी व्यापारासंदर्भात विचारणा केली.