अभिनेत्री समंथा रुग्णालयात दाखल?

    दिनांक :24-Nov-2022
|
मुंबई,  
साऊथची सुपरस्टार समांथाची तब्येत खराब झाल्यामुळे Samantha hospitalized तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आली होती. आता अभिनेत्रीच्या प्रवक्त्याने यावर मौन तोडले आहे. या बातम्या पूर्णपणे खोट्या असून लोक केवळ अफवा पसरवत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. समंथा पूर्णपणे बरी आहे आणि मायोसिटिसच्या समस्येतून बरी होत आहे. काही काळापूर्वी समंथाने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे माहिती दिली होती की ती मायोसिटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. मात्र, ती उपचार घेत असून ती बरी होण्याच्या टप्प्यावर आहे.
 
yht  
 
"समंथाला रुग्णालयात दाखल केल्याबद्दल Samantha hospitalized जे काही बातम्या येत आहेत, त्या अफवा आहेत. पूर्णपणे खोट्या आहेत. समंथा घरी आहे आणि विश्रांती घेत आहे." वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, समंथा शेवटची 'यशोदा' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटाला चाहते, समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.