सोयाबीन-कापसाचा भाव स्थिर राहण्यासाठी केंद्राशी चर्चा करणार

    दिनांक :24-Nov-2022
|
- मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही
मुंबई : Soybean-Cotton सोयाबीन-कापूस पिकाच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतक-यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भातील धोरणात बदल करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाला आश्वासित केले.
 
 
Eknath Shinde soybeans
 
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर स्वाभिमान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व त्यांच्या शेतकरी शिष्टमंडळाने आंदोलन मागे घेतले. Soybean-Cotton कापूस उत्पादकांच्या केंद्र व राज्य सरकारशी संबंधित मागण्यांसंदर्भात शेतकर्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. दरम्यान, कृषी कर्जासाठी सिबीलची अट लावू नये, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. राज्यातील राष्ट्रीयकृत बँक अशी अट लावत असतील तर तत्काळ रद्द करावी व संबंधित बँकांवर कारवाई करावी असे निर्देश फडणवीस यांनी अधिकार्‍यांना दिले.