शेअर बाजार 62 हजारांवर...

    दिनांक :24-Nov-2022
|
मुंबई,
भारतीय शेअर बाजार Stock market पुन्हा एकदा शिखरावर गेला असून आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी सेन्सेक्स 762.10 अंकांनी वाढून 62,272.68 अंकांच्या सार्वकालिक उच्चांकावर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 62412 अंकांवर गेला. गेल्या वर्षी 19 ऑक्टोबरला सेन्सेक्स 62,245 अंकांच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी निफ्टी 216.85 अंकांनी वाढून 18,484.10 वर पोहोचला. शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना 2.37 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. गुरुवारी BSE मार्केट कॅप 2,83,69,988.02 कोटी रुपये होते. एका दिवसापूर्वीच्या 2,81,44,318.63 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपच्या तुलनेत 2 लाख कोटींहून अधिक वाढ झाली आहे.
 
साद re
 
बीएसई निर्देशांकात आयटी क्षेत्रातील समभाग सर्वाधिक वाढले. बीएसईच्या शीर्ष 30 समभागांमध्ये  इन्फोसिस, एचसीएल, विप्रो, टेक महिंद्रा, टीसीएस हे सर्वाधिक वाढले. Stock market पॉवरग्रीड, एचडीएफसी, एचयूएल, एचडीएफसी बँक, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी आली. भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेवरील मंदीची भीती दूर होताना दिसत आहे. यापूर्वी अमेरिकेची सेंट्रल बँक फेड रिझर्व्हने नरमाई दाखविण्याचे बोलले होते. तेव्हापासून भारतासह जागतिक बाजारपेठेचा आत्मविश्वास थोडा बळकट झाला आहे.