ताहिर हुसैनविरोधातील बेकायदेशीर सावकारीचा आरोप कायम

    दिनांक :24-Nov-2022
|
- दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
 
नवी दिल्ली, 
ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणातील आरोपी आणि आपचा नेता Tahir Hussain ताहिर हुसैन याने आपल्याविरोधात दाखल बेकायदेशीर सावकारीचे आरोप हटवण्यात यावे, अशी मागणी करीत दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज गुरुवारी फेटाळली.
 
 
Tahir Hussain
 
दाखल करण्यात आलेली याचिका आणि सोबतचे अर्ज फेटाळले जात आहे, असे न्या. अनू मल्होत्रा यांनी सांगितले. ताहिर हुसैनने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने 15 नोव्हेंबर रोजी निर्णय सुरक्षित ठेवला आहे. बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यातील कलम तीन आणि चारअन्वये(बेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यातील शिक्षा) गुन्हे दाखल करण्याबाबत न्यायालयाने 3 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशाला आव्हान देत Tahir Hussain ताहिर हुसैन याने याचिका दाखल केली होती. बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार आरोप निश्चित करण्यासाठी त्याच्याकडून कोणतीही मालमत्ता किंवा गुन्ह्याची रक्कम जप्त करण्यात आली नाही, असा युक्तिवाद ताहिर हुसैनने न्यायालयात केला होता.