कासव संरक्षणासाठी भारताच्या प्रयत्नांचे कौतुक

    दिनांक :24-Nov-2022
|
पनामा, 
पनामा शहरात सीआयटीईएस अर्थात लुप्तप्राय वन्यजीव Turtle protection आणि वनस्पतीच्या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील निर्बंधांसाठी कॉप-19 देशांची 19 वी बैठक झाली. या संदर्भात माहिती देताना पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने सांगितले की, कॉप-19मध्ये, गोड्या पाण्यातील कासव बाटागूर कचुगा समाविष्ट करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला सीआयटीईएसच्या कॉप-19 मधील देशांचा व्यापक पाठिंबा मिळाला. या सर्व देशांनी भारताचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आणि या संदर्भातले प्रस्ताव स्वीकारले गेले.
 
 
Turtle protection
 
सीआयटीईने कासव Turtle protection आणि ताज्या पाण्याच्या कासवांच्या संवर्धनाच्या क्षेत्रात भारताने केलेल्या कामांची आणि देशातील वन्यजीव गुन्हेगारी आणि कासवांच्या अवैध व्यापाराशी लढा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा आणि नोंद केली. कासव आणि गोड्या पाण्यातील कासवांवर सीआयटीईएस सचिवालयाने सादर केलेल्या ठराव दस्तऐवजांमध्ये विशेषत: वन्यजीव गुन्हे नियंत्रण संस्थेने सुरू केलेल्या ऑपरेशन टर्टशील्डसार‘या मोहिमांमध्ये भारताने मिळवलेल्या प्रशंसनीय परिणामांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे शिकारी आणि बेकायदेशीर तस्करीत गुंतलेल्या अनेक गुन्हेगारांना पकडण्यात यश आले. गोड्या पाण्यातील कासवांचा व्यापार रोखण्यासाठी केंद्रीय संस्थांनी देशाच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात जप्ती केली.
 
 
या परिषदेमध्ये, भारताने देशातील कासव आणि गोड्या पाण्यातील Turtle protection कासवांच्या संरक्षणाबाबत आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारताने हे देखील अधोरेखित केले आहे की कासव आणि गोड्या पाण्यातील कासवांच्या अनेक प्रजाती ज्यांना गंभीरपणे धोक्यात असलेल्या, लुप्तप्राय, संवेदनशील आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजाती म्हणून ओळखले जाते त्यांचा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये आधीच समावेश केला गेला आहे आणि त्यांना उच्च दर्जाचे संरक्षण दिले गेले आहे.