राज्यपालांचे पार्सल परत पाठवा

    दिनांक :24-Nov-2022
|
- उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई,
ज्यांना वृध्दाश्रमातसुध्दा कुणी घेणार नाही अश्यांची राज्यपालपदी नियुक्ती होते आहे. अशा मेंदूच्या मागे नक्की कुठला मेंदू याचा शोध घ्यावा लागेल. मी राज्यपाल पदाचा आदर करतो, परंतु कोश्यारींचा नाही. आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची अव्हेलना, अपमान कोश्यारीने केला आहे. आता हे पार्सल परत पाठविण्याची वेळ आली आहे. याविरोधात महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र यावे आणि याविरोधात आवाज उठवू असे आवाहन Uddhav Thackeray उदधव ठाकरे यांनी केले.
 
 
Uddhav Thackeray- Koshyari
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याने राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. केंद्राला जाग येणे गरजेचे महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा नाही हे पुन्हा दाखवण्याची वेळ आली आहे. शांततेच्या मार्गाने विरोध करुयात असे सांगतानाच महाराष्ट्र बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे महाराष्ट्रातील गावांवर अधिकार सांगू लागले आहेत. ही दिल्लीश्वरांची भूमिका आहे काय असा सवालही Uddhav Thackeray त्यांनी केला.
 
 
त्याबाबत Uddhav Thackeray उदधव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी राज्यपाल पदाचा आदर करतो, परंतु कोश्यारींचा नाही. या अगोदर सावित्रीबाई, महात्मा फुलेंबाबत आपत्तीजनक विधान. त्यानंतर मुंबई, ठाणेकरांच्या बाबतीत तोच प्रकार आणि आता आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची अव्हेलना, अपमान कोश्यारीने केला आहे. मुख्यमंत्री लाचार असल्यामुळे दिल्लीश्वरांच्या कृपेमुळे मुख्यमंत्रीपदी त्यांच्यात राज्यपालांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही. मुख्यमंत्री म्हणजे पैचान कोन अशी अवस्था. उपमुख्यमंत्री फक्त सारवासारव करताहेत. याबाबत शरद पवार, छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका मांडली आहेच. पण आता माझे तर भाजपमधील महाराष्ट्रप्रेमींनाही आवाहन आहे की सगळयांनी एकत्र आणी हे पार्सल परत पाठवूया असे आवाहन उदधव ठाकरे यांनी केले.
मंत्रिमंडळाची बैठक का रद्द केली?
अपवादात्मक परिस्थितीतच मंत्रिमंडळाची बैठक रद्द करतात. माझ्या वाचनात आलय की मंत्रिमंडळ गुजरात निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहे. गुजरात निवडणुकांसाठी महाराष्ट्रात सुटी ही नविन पध्दत आहे. उद्या पाकिस्तानात निवडणुका असल्यावरही कदाचित सुटी जाहीर करतील, असा टोलाही Uddhav Thackeray उदधव ठाकरेंनी लगावला.