विद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा : कोश्यारी

    दिनांक :24-Nov-2022
|
मुंबई, 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडून भारताला सशक्त करण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला, तर देश आत्मनिर्भर होईल म्हणून या अभियानाला चालना देण्यासाठी University विद्यापीठाने आत्मनिर्भर विद्यापीठ होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल Bhagat Singh Koshyari भगतसिंह कोश्यारी यांनी केले. राजभवनात विद्यापीठ कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह सर्व विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.
 
 
Bhagat Singh Koshyari
 
शिक्षण धोरणात राज्य अग्रेसर राहील : शिंदे
University विद्यापीठात होणारे संशोधन, शैक्षणिक उपक्रम, नावीन्यपूर्ण शिक्षण यावर शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो. म्हणून कुलगुरू विद्यार्थ्यांचे खर्‍या अर्थाने पालक असतात, असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वर्षाला 25 हजार तरुण उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. शिक्षण फक्त हुशार करणारे नसावे तर सध्याच्या परिस्थितीत ठामपणे पाय रोवून उभे राहण्याची जिद्द निर्माण करणारे असावे, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
गुणवत्ता, सुलभतेकडे लक्ष द्या : फडणवीस
भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल 5 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने सुरू असून, हे स्वप्न साकार करण्यासाठी University विद्यापीठ ही मोठी शक्ती आहे.त्यामुळे विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता आणि सुलभतेकडे लक्ष द्यावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी आहेत. विद्यापीठ, महाविद्यालयांच्या अहवालातील, निरीक्षण, सूचना, उपाययोजनांची माहिती जनतेला पाहता आली पाहिजे. शैक्षणिक धोरणातले बदल आपण स्वीकारून गती द्यावी, यासाठी ऑनलाईन सिस्टम विकसित करून डॅशबोर्ड तयार करावा, असे फडणवीस यांनी सांगितले.
यंदापासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु करा : पाटील
University विद्यापीठ, महाविद्यालयांना येणार्‍या शैक्षणिक वर्षांपासूनच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करावी लागेल. येत्या शैक्षणिक वर्षांपासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु करावा. नवीन शैक्षणिक धोरणातील बदलामुळे प्राध्यापकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी सेवानिवृत्त कुलगुरू यांची समिती गठीत करण्यात येईल. अभ्यासक्रम, कामाचा भार, पदसंख्या, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी याबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी प्राध्यापकांशी चर्चा करण्यात येईल, अशा सूचना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.