‘फोर्ब्स’ मुखपृष्ठावर झळकली यवतमाळची तरुणी

    दिनांक :24-Nov-2022
|
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
यवतमाळ जिल्ह्यातील (cover of Forbes) आर्णी तालुक्यातील वरुड (तुका) येथील पंकज व श्वेता महल्ले या शेतकरी दाम्पत्याने दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ‘ग्रामहित’ या स्टार्टअपच्या संस्थापक संचालक श्वेता पंकज महल्ले (ठाकरे) यांनी अमेरिकी कार्पोरेट मासिक असलेल्या फोर्ब्सच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवले आहे. श्वेताच्या या यशाने यवतमाळ जिल्हा कार्पोरेट विश्वात जागतिक स्तरावर जाऊन पोहोचला आहे.
 
cover of Forbes
 
यावर्षी ‘फोर्ब्स यादीत’ (cover of Forbes) निवड व्हावी म्हणून जगातील 650 कंपन्यांमधून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) येथील पंकज व श्वेता महल्ले यांनी स्थापन केलेल्या ‘ग्रामहित’ने फोर्ब्स आशियाच्या यादीत स्थान मिळविले होते. फोर्ब्सचा आशिया पॅसिफिक भागातील अकरा क्षेत्रातील तंत्रस्नेही उद्योजकांच्या यशोगाथांची माहिती देणारा डिसेंबरचा अंक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. फोर्ब्सच्या या अंकाच्या मुखपृष्ठावर अन्य चार तरुण व्यवसायींसोबत श्वेता यांचे छायाचित्र झळकले आहे.
 
 
फोर्ब्स (cover of Forbes) हे मासिक वित्त, उद्योग, गुंतवणूक, विपणन, तंत्रज्ञान, संप्रेशण, विज्ञान, राजकारण, कायदा आदी विषयांवर अंक प्रकाशित करते. फोर्ब्सने दखल घ्यावी यासाठी या क्षेत्रात कार्य करणारे तरुण कायम धडपडत असतात. एखादी सामाजिक समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने व कल्पकतेने सोडवण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवा पुरवणार्‍या संस्थांची फोर्ब्सकडून दखल घेतली जाते. आपली कामगिरी जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना फोर्ब्सकडून प्रोत्साहन दिले जाते. यावर्षी फोर्ब्सच्या यादीत निवड व्हावी म्हणून 650 कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यात आशिया खंडातील नामांकित सामाजिक उद्योजकता क‘मवारीत ‘ग्रामहित’ने स्थान मिळवले आहे.
 
 
या मासिकाच्या (cover of Forbes) मुखपृष्ठावर झळकणे ही गौरवास्पद कामगिरी समजली जाते. श्वेता यांनी पती पंकज यांच्यासमवेत ग्रामहित ही शेतकर्‍यांसाठी शेतमाल विपणन क्षेत्रात काम करणारी कंपनी स्थापन करून अवघ्या दोन वर्षांत जागतिक स्तरावर मानांकन मिळवल्याने जिल्ह्याचाही लौकिक वाढला आहे. ग्रामहित ही शेतमाल विपणन व्यवस्थेतील व्हिलेज ट्रेड सेंटर आहे. कोरोना काळात पंकज महल्ले या तरुणाने कॉर्पोरेट जीवनशैली सोडून पत्नी श्वेतासह थेट गाव गाठले. पंकज व श्वेता दोघेही उच्चशिक्षित आहेत. गावात परतण्यापूर्वी ते दोघेही कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या हुद्यावर होते. मात्र कोरोनामुळे लागलेली टाळेबंदी आणि त्या काळात शेतकर्‍यांची होत असलेली आर्थिक घुसमट व ओढाताण त्यांनी जवळून अनुभवली आणि दोघांनीही वरूडला परतून ‘ग्रामहित’ची स्थापना केली.