काटकुंभच्या मुख्याध्यापकाचा लाजीरवाणा प्रताप

पालकांमध्ये असंतोष, आंदोलनाचा इशारा

    दिनांक :24-Nov-2022
|
तभा वृत्तसेवा
धारणी
धारणी पंचायत समिती अंतर्गत काकरमल जि. प. शाळेत दारु पिऊन धिंगाणा करणार्‍या Katakumbh headmaster शिक्षकाची चित्रफित सर्वदूर चर्चेत असतानाच काटकुंभ गावातील शाळेचा मुख्याध्यापक अविनाश राजनकर यांचा शाळेत झोपताना व लघुशंका करतानाचे व्हिडीओ प्रसारित झाल्याने मेळघाटातील शिक्षकांचे असली रुप समोर आले आहे. त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली. मात्र, पालकांचे समाधान झालेले नाही. त्याला बरखास्त करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संदीप तोटे यांनी दिला आहे.
 
Katakumbh headmaster
 
मागील आठवड्यात काटकुंभ पं. स. धारणीच्या जि. प. शाळेचा Katakumbh headmaster मुख्याध्यापक विरुद्ध खंडविकास अधिकारी महेश पाटील यांना आदिवासी पालकांनी तक्रार देताना त्याच्या काळ्या हरकतींची माहिती दिलेली होती. मात्र कारवाई झाली नाही. परिणामी शिक्षकाला झोपताना व वर्गखोलीत लघुशंका करतानाचा व्हिडीओ शुटींग करण्यात आली. मेळघाटातील शिक्षकांच्या कारनाम्या बाबतीत दररोज नवनवीन माहिती समोर येत असते. येथील शाळांना भेट दिली असता आदिवासी विद्यार्थ्यांकडून प्रभावी माहिती मिळत असते. उदा. गुरूजी अभी खेत मे गया बोनी करणे, गुरूजी दोन दिन बाद आयेगा, सर ठेकेदारी करता, सर के खेत मे निंदन चालू है, गुरूजी गाव गया, उसके बदले गाव का एक लडका पढाता है, गुरूजी स्लॅब डालने गया तर सर की गाडी खराब है, वगैर-वगैरे उत्तरे मिळतात. यावरुन मेळघाटातील शिक्षक शिकविण्याऐवजी कोणते-कोणते उद्योग करतात याबाबतीत सहज समजते.
 
 
आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष (युवा) संदीप तोटे यांनी Katakumbh headmaster राजनकरांचा व्हिडीओ सोशल मिडियावर टाकला आणि मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. सदर मुख्याध्यापक निलंबित झाला असून बरखास्त न केल्यास जि. प. शिक्षण विभागाविरुद्ध धारणीत आंदोलन करण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे. सोमवार आणि शुक्रवार किंवा शनिवार जि. प. शाळांना भेट देऊन अधिकार्‍यांना आदिवासी विद्यार्थ्यांवर उपकार करावे, अशी मागणी आहे.