देशाची अर्थव्यवस्था मध्यम वेगाने वाढेल, महागाई कमी होईल

    दिनांक :24-Nov-2022
|
- अर्थमंत्रालयाचा अहवाल
 
नवी दिल्ली, 
economy जागतिक अर्थव्यवस्था कठीण स्थितीत असली तरी, स्थूल आर्थिकतेच्या बळावर येत्या काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था मध्यम वेगाने वाढेल तसेच देशातील महागाई कमी होईल, असे अर्थमंत्रालयाने आज गुरुवारी अहवालात म्हटले आहे. येत्या काही महिन्यांत खरीप पिके आल्यानंतर महागाईचा दबाव कमी होईल आणि त्याच वेळी व्यवसायाच्या संधींमध्ये सुधारणा होऊन रोजगाराच्या संधी वाढतील, असे अहवालात म्हटले आहे.
 
 
economy
 
अमेरिकेतील कठीण स्थितीत असलेली economy अर्थव्यवस्था भविष्यातील जोखीम आहे, ज्यामुळे समभागांच्या किमती, कमकुवत चलने आणि उच्च रोखे उत्पन्न कमी होऊ शकते, परिणामी जगभरातील अनेक सरकारांसाठी कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होऊ शकते, असे ‘ऑक्टोबरसाठी मासिक आर्थिक आढावा’ नावाच्या या अहवालात म्हटले आहे. जागतिक विकासाच्या संभाव्यतेत झपाट्याने होणारी घसरण, उच्च चलनवाढ आणि बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती यामुळे जागतिक मंदीची भीती वाढली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
 
 
economy जागतिक मंदीमुळे भारताच्या निर्यात व्यवसायाचा दृष्टीकोन कमी होऊ शकतो. तथापि, देशांतर्गत लवचिक मागणी, बळकट आर्थिक व्यवस्था आणि संरचनात्मक सुधारणांसह पुन्हा चालना देणारे गुंतवणूक चक‘ आर्थिक विकासाला चालना देईल. अशा जगात जिथे चलनवाढ वाढल्याने वृद्धीची शक्यता कमी झाली असताना भारताने स्थूल आर्थिकतेला प्राधान्य दिल्याने आगामी वर्षांत मध्यम गतीने वाढ होईल, असे या अहवालात म्हटले आहे.