कत्तलीकरिता जाणार्‍या बैलांना जीवनदान

पोलिस व गोरक्षा मंचाची महत्त्वाची भूमिका

    दिनांक :24-Nov-2022
|
तभा वृत्तसेवा
धामणगाव रेल्वे, 
धामणगाव ते अंजनसिंगी रोडवरील दाभाडा फाट्याजवळ गोवंश तस्करांना पोलिसांनी life to bulls 6 बैलांसह अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगरूळ दस्तगीर टी पॉईंट येथे नाकाबंदी दरम्यान संशयित वाहनास हात दाखवून थांबण्याचा इशारा दत्तापूर पोलिसांनी केला असता वाहनचालकाने वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अंजनसिंगी रोडवरील दाभाडा फाट्याजवळ वाहन थांबविले. बोलेरो पिकअप व्हॅनची पाहणी केली असता त्यामध्ये गोवंश जातीचे सहा बैल रात्री दीड वाजता निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी घेऊन जाताना जिवंत आढळून आले.
 
life to bulls
 
यावरूनजुनेद खान मजीद खान आणि नाशिक खान जमीर खान रा. नांदगाव खंडेश्वर या दोन life to bulls आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेपूर्वी धामणगाव तालुक्यात तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध गोतस्करी होत असल्याचे निवेदन गौसेवा संघटनेने जिल्हाध्यक्ष हितेश गोरिया यांच्या नेतृत्वात नुकतेच दिले होते. त्यामुळे ठाणेदार श्याम वानखडे यांनी आपल्या संपूर्ण चमुला गोतस्करी तसेच अवैध गोवंशाबाबत अधिक सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळेच या घटनेचा उलगडा झाला आहे. पोलिसांसोबतच गोरक्षा मंच समितीचे हितेश गोरिया, अनिल शर्मा, गोपाल शर्मा, विनय शर्मा, निखिल क्षीरसागर तसेच कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गोवंश तस्करीवर अधिक आळा घालण्याची गरज असल्याचे गोरक्षा मंचचे जिल्हाध्यक्ष हितेश गोरिया म्हणाले. या प्रकरणात ठाणेदार श्याम वानखडे यांच्या नेतृत्वात पीएसआय रवींद्र बारड, सागर कदम, अरुण पवार यासह पोलिस कॉन्स्टेबल अधिक तपास करीत आहे.