निसर्गोपचार दिनानिमित्त टपाल आवरणाचे प्रकाशन

    दिनांक :24-Nov-2022
|
पुणे, 
पाचव्या naturopathy निसर्गोपचार दिनानिमित्त विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष आवरणाचा समावेश असलेला प्रथम अल्बम आयुष मंत्रालयाच्या सहसचिव कविता गर्ग यांना सुपूर्द केला.
 
 
naturopathy
 
राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था यांच्यामार्फत लोणी काळभोरच्या एमआयटीत झालेल्या कार्यक‘मास संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. के. सत्यलक्ष्मी, राघवेंद्र राव, डाक अधीक्षक बी. पी. एरंडे उपस्थित होते. महात्मा गांधी यांनी 18 नोव्हेंबर 1945 रोजी नेचर क्युअर फाउंडेशन ट्रस्टचे आजीवन सदस्यत्व घेतले आणि करारावर स्वाक्षरी केली होती. आयुष मंत्रालयाने (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) 18 नोव्हेंबर रोजी naturopathy निसर्गोपचार दिवस घोषित केला होता.