अंगणवाडीत पडली पाण्याच्या टाकीची भिंत!

    दिनांक :24-Nov-2022
|
भोपाळ, 
गुरुवारी मुरैना येथील भोगीपुरा गावात fell Anganwadi असलेल्या अंगणवाडी केंद्रात गावातील मुले खेळत असताना अचानक अंगणवाडी केंद्राच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली. पाण्याच्या टाकीची भिंत कोसळल्याने अंगणवाडी केंद्राच्या आवारात खेळणारी तीन मुले भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आली. त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला तर दोन मुले जखमी झाली. मृत बालकाचा मृतदेह तंद्रा पोलीस ठाण्यासमोर ठेवून कुटुंबीयांनी आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी टाकी बांधणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
fght
 
भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबलेल्या fell Anganwadi  मुलांना घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी तातडीने बाहेर काढले, मात्र तोपर्यंत अभिषेक नावाच्या एका मुलाचा मृत्यू झाला तर अन्य दोन मुले जखमी झाली. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयत बालकाचा मृतदेह तंद्रा पोलीस ठाण्यासमोर ठेवून ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. टाकी बांधणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. वाहतूक कोंडीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अंगणवाडी केंद्रातील पाण्याची टाकी बांधणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध एफआयआर दाखल करून त्याला अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. यासोबतच इतर पाण्याच्या टाक्यांची माहिती संकलित करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.