नवीन वर्षाच्या सुरवातीला करा "रामायण यात्रा"

    दिनांक :24-Nov-2022
|
नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हीही धार्मिक "Ramayana Yatra" प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर रेल्वेने तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने भगवान राम आणि सीता मातेची नगरी अयोध्येला भेट देण्यासाठी एक उत्तम पॅकेज लॉन्च केले आहे. या टूर पॅकेजअंतर्गत प्रवाशांना स्वदेश दर्शन टुरिस्ट ट्रेनमधून प्रवास करण्याची एक उत्तम संधी मिळणार आहे.
 

ytr  
 
आयआरसीटीसीच्या या "Ramayana Yatra" पॅकेजअंतर्गत प्रवाशांना अयोध्या तसेच सीतामढी, जनकपूर, बक्सर, प्रयागराज, वाराणसी आणि चित्रकूट येथून सहलीवर नेले जाईल. या पॅकेजअंतर्गत प्रवाशांना जेवण आणि राहण्याची सुविधाही दिली जाणार आहे. IRCTC नुसार, हे टूर पॅकेज 18 फेब्रुवारी 2023 ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत वैध असेल. या 8 दिवसांच्या टूर पॅकेज अंतर्गत ग्राहकांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळणार आहे.
अयोध्या टूर पॅकेज
या पॅकेजची किंमत "Ramayana Yatra" स्लीपर क्लाससाठी प्रति व्यक्ती 15,770 रुपये असेल, तर आराम वर्गासाठी प्रति व्यक्ती 18,575 रुपये आकारले जातील. या पॅकेजमध्ये प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाणार असून, दररोज 1 लिटर पाण्याची बाटलीही दिली जाणार आहे. या पॅकेजबद्दल अधिक माहिती IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून मिळू शकते.