कायम ट्रेंडमध्ये असणाऱ्या साड्या!

    दिनांक :04-Dec-2022
|
 काही असे पोशाख आहेत जे वर्षभर ट्रेंडमध्ये राहतात.Sarees in trend  या साडी थोड्या महाग असतात. पण एकदा घेतले तरी ह्याची फॅशन कायम चालणारी असते. तुम्हाला  एकदा साडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर या साड्यांची निवड तुम्ही करू शकता.  
 
fhyt

सीक्वेन्स साडी -
2022 मध्ये सिक्वेन्स साड्या देखील ट्रेंडमध्ये आहेत. Sarees in trend अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी या साड्या परिधान करून फॅशनची नवीन ध्येये ठेवली आहेत. या प्रकारची साडी रात्रीच्या पार्ट्यांसाठी चांगला पर्याय आहे.
 
hg
 
चिकनकारी साडी –
चिकनकारी साड्या या वर्षी ट्रेंडमध्ये आहेत. बॉलिवूड अभिनेत्री काही कार्यक्रमांमध्ये चिकनकारी साडी नेसताना दिसल्या. अनेक महिलांना चिकनकारी वर्कच्या कुर्त्याही घालायला आवडतात.
 
 
tryt
 
ऑर्गेन्झा साडी -
ऑर्गेन्झा साड्या 2022 मध्ये ट्रेंडमध्ये आहेत. या साड्या वजनाने हलक्या असतात. अनेक बॉलिवूड अभिनेत्री ऑर्गेन्झा साडीमध्ये स्पॉट झाल्या होत्या. या साडीतील फ्लोरल डिझाइन महिलांना खूप आवडते.
 
ty
 
प्लीटेड साडी-
प्लीटेड साडीची फॅशन देखील नवीनतम आहे. ही साडीही यंदा ट्रेंडमध्ये आहे. ही साडी तुम्हाला सर्व प्रकारच्या रंगात मिळेल. या प्रकारची साडी तुम्हाला शोभिवंत लुक देण्याचे काम करेल.
 
fg