4 ते 10 डिसेंबर 2022, Weekly-Horoscope

Weekly-Horoscope

    दिनांक :04-Dec-2022
|
साप्ताहिक राशिभविष्य 

saptahik  
 
 
मेष : प्रारंभीच शुभवार्ता कळावी
Weekly-Horoscope : या आठवड्याची सुरुवात काहीशी खर्चिक असली, तरी नंतर या सप्ताहातील ग्रहांचे गोचर भ्रमण आपल्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे. व्यावसायिक उन्नती आणि नोकरीत वेगवान प्रगती होण्याची चिन्हे दर्शवीत आहे. प्रारंभातच या अनुषंगाने एखादी शुभवार्ता कळू शकते. कार्यक्षेत्रात पत वाढू लागेल. याचे दूरगामी चांगले परिणाम घडून येतील. सरकार दरबारी अडलेली कामे, कोर्टातील प्रकरणे वेग घेऊ शकतील. काही प्रकरणे तर पूर्णत्वासदेखील जाऊ शकतात. विवाहेच्छू युवांचे विवाह योग यावेत.
शुभ दिनांक - 4, 5, 6, 7.
 
वृषभ : जीवनाला नवे वळण
या सप्ताहाच्या सुरुवातीस आपल्याला प्रतिष्ठा, हुद्दा आणि सन्मान वाढविणारे योग गोचर ग्रहांच्या भ्रमणामुळे लाभणार आहेत असे दिसते. हे सारे आपणास खुशी व खुबीने आपलेसे करून घेता येऊ शकेल. त्यामुळे आपल्या जीवनाला एखादे नवे वळण मिळण्याचीदेखील शक्यता राहील. नोकरीत असलात किंवा आपला व्यवसाय असला, तरी ते आपली प्रतिष्ठा वाढीस लावणारे असेल. नोकरीत काहींना पगारवाढ, पदोन्नती मिळू शकेल. युवा वर्गाच्या विवाहाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण हालचाली घडतील.
शुभ दिनांक - 7, 8, 9, 10.
 
 
मिथुन : भाग्योदयकारक घटनाक्रम
Weekly-Horoscope :या आठवड्याच्या सुरुवातीस आणि शेवटास सर्व चांगल्या योगांमध्ये आपणास राशिस्वामीचे पाठबळ मिळणार आहे. यामुळे बर्‍यापैकी दिलासा मिळू शकेल. काही सुखवार्ता कानी पडतील. व्यावसायिक उन्नती आणि नोकरीत प्रगती दर्शविणारे योग लाभतील. काही युवा वर्गाच्या विवाहाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण हालचाली घडतील. स्थळ पक्के करणे, विवाहाची बोलणी होणे, साक्षगंध-साखरपुडा असे कार्यक्रम घडू शकतात. घरात पाहुण्यांची, मित्रवर्गाची वर्दळ राहील. भाग्योदयकारक घटना घडतील.
शुभ दिनांक - 4, 5, 8, 9.
 
 
कर्क : वादविवाद लांबवू नका
या आठवड्यातील ग्रहमान पाहता आपण सतत कुठल्या ना कुठल्या वादविवादात, भांडणात गुरफटले जाण्याची बरीच मोठी शक्यता आहे. आपल्या कार्यालयात तसेच सहकार्‍यांमध्ये मतभेद-मतांतरे व्यक्त करताना कठोरतम शब्दांचा वापर करू नका. भांडणे-वाद फार काळ लांबणार नाहीत, त्यांचे स्वरूप वाढणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. कुणाची मध्यस्थी करू नका. अपघात-भयदेखील निर्माण होत आहे. त्यामुळे सावध असावयास हवे. वाहने सांभाळून चालवावीत. वेगावर नियंत्रण असावे.
शुभ दिनांक - 4, 5, 6, 7.
 
 
सिंह : स्वभावातील उग्रपणा टाळा
Weekly-Horoscope :हा आठवडा आपणास संमिश्र स्वरूपाचा जाणार आहे असे दिसते. आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले काही ग्रहयोग लाभकारक असले, तरी आठवडाअखेरचे ग्रहमान आपणास काहीसे विपरीत वागावयास लावणारे आहे. स्वभावात उग्रपणा निर्माण होऊ शकतो. यामुळे नसते वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. कार्यक्षेत्रात सांभाळून असावे. दरम्यान, संततीविषयक काही चांगल्या बातम्या कानावर येऊ शकतात. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीनेही काही चांगल्या घडामोडी संभव आहेत.
शुभ दिनांक - 5, 6, 9, 10.
 
 
कन्या : भाग्याची साथ मिळणार
या आठवड्यात आपणास लाभलेले गोचर ग्रहमान पाहता, काही महत्त्वाच्या घटनांमध्ये शुभत्वाचा प्रभाव वाढणार आहे. लाभावह घटनाक्रम असणार आहे. आपल्या निर्णयांना भाग्याची साथ मिळणार आहे. आपण अगोदर केलेली गुंतवणूक, आखलेल्या योजना या सार्‍यांना आता चांगली फले लाभू शकणार आहेत. काहींना नोकरीत उत्तम संधी चालून येतील. तुम्ही आतापर्यंत घेतलेले परिश्रम, केलेल्या कामांची नोंद अधिकारी स्तरावर घेतली जाऊन त्याचे नोकरीत चीज होताना दिसेल.
शुभ दिनांक - 4, 6, 8, 10.
 
 
तूळ : अचानक व अनाकलनीय
Weekly-Horoscope :या आठवड्यातील ग्रहमानाच्या शुभत्वामुळे व्यावसायिक वर्गाला काही विशेष योग संभवतात. आर्थिक आवक वाढलेली असेल. बाजारातील तेजीचा लाभ मिळेल. काहींना व्यवसायाचा विस्तार करता येईल तर काहींना नव्या व्यवसायाला सुरुवातदेखील करता येऊ शकेल. विदेशी जाण्याच्या योजना आखणार्‍यांना शिक्षण- नोकरीच्या निमित्ताने जाण्याची संधी लाभू शकेल. काही अचानक व अनाकलनीय योग निर्माण होऊन इच्छापूर्तीचा आनंद लाभणार, हे निश्चित. युवांना नोकरीच्या संधी लाभतील.
शुभ दिनांक - 6, 8, 9, 10.
 
 
वृश्चिक  : आर्थिक समाधान मिळेल
आठवड्याच्या सुरुवातीलाच काही महत्त्वपूर्ण आर्थिक योग आपली स्थिती बळकट करू शकतील. आतापर्यंत काहींना आजारपणे, अनावश्यक व आकस्मिक खर्चाचा अनुभव आला असेल, ते आता यातून बाहेर पडू शकतील. नोकरीत सहकार्‍यांची मदत, अधिकार्‍यांची मर्जी लाभून प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण सुरू राहील. कामावर आपली छाप निर्माण करता येईल. व्यावसायिकांनाही चांगले योग येतील. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील. मुलांची प्रगती सुखावेल. एकूण स्थिती समाधानकारक राहील.
शुभ दिनांक - 4, 6, 8, 10.
 
 
धनु : आर्थिक लाभाच्या संधी
Weekly-Horoscope :या आठवड्यातील ग्रहमान सुरुवातीस उत्तम असले तरी आठवड्याच्या मध्यात काहीसे मानसिक चिंता, ताण-तणाव व आरोग्याच्या काही छोट्या-मोठ्या कुरबुरींना चालना देणारे ठरावे. तथापि, काहींना कार्यक्षेत्रात प्रगती व आर्थिक लाभ घडविणार्‍या महत्त्वाच्या संधी अकल्पितरीत्या निर्माण होऊ शकतात. व्यवसायातदेखील अशा संधी येतील. त्यांचा लाभ घेतल्यास आपला आनंद व उत्साह दुणावेल. आर्थिक लाभासह आपली वित्तीय स्थिती मजबूत होईल. कुटुंबात समाधान व आनंदाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक - 4, 6, 8, 9.
 
 
मकर : अतिरिक्त कामांचा बोजा
या आठवड्याची सुरुवात काहीसा आर्थिक पेच, मोठे खर्चिक योग निर्माण करणारी ठरू शकते. काहींना आरोग्याच्या बाबतीतदेखील त्रास निर्माण होऊ शकतो; पण सारे काही आटोक्यात असेल. व्यवसाय व नोकरीत आपणास काही अतिरिक्त कामांचा बोजा वहावा लागू शकतो. त्यामुळे धावपळ-दगदग होणार. या परिश्रमाचे आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. व्यापारी वर्गालाही चांगले योग येतील. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील. मुलांची प्रगती सुखावेल.
शुभ दिनांक - 4, 6, 9, 10.
 
 
कुंभ : आर्थिक कोंडी फुटणार
Weekly-Horoscope :या आठवड्यात लाभलेले ग्रहयोग आपली आर्थिक कोंडी फोडतील असे दिसते. आपली आर्थिक बाजू मजबूत होऊ शकेल. विविध मार्गांनी पैशाची आवक सुरू होऊ शकते. नोकरी-व्यवसायात प्रगती होऊन आर्थिक आवक वाढेल. काहींना नोकरीत पगारवाढ- पदोन्नती मिळू शकेल. नोकरीच्या शोधात असणार्‍या युवा वर्गाला चांगल्या संधी लाभतील. उधारी, जुनी येणी येतील. आपले अंदाजपत्रक आता मजबूत करता येऊ शकेल. कुटुंबासह प्रवासाच्या योजना संभवतात. मंगलकार्यात सहभाग राहील.
शुभ दिनांक - 4, 6, 8, 10.
 
 
मीन : कुटुंबात सामंजस्य राहील
Weekly-Horoscope :आठवडाअखेर आपणास शुभ योगांचे अनुभव लाभतील असे उपलब्ध गोचर ग्रहस्थितीवरून दिसते. कुटुंबात सामंजस्य व सहकार्याचे वातावरण राहील. आपल्या योजनांना कुटुंबाची मदत मिळत राहील. काही महत्त्वपूर्ण योगांमुळे नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग दिसू लागतील. आर्थिक समस्या संपुष्टात येतील. व्यवसाय वाढीस हा सप्ताह उपयुक्त असला, तरी आठवडामध्यात तो मित्रवर्गात अशांतता, नाराजी निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे सावध असावे. आरोग्याकडेदेखील लक्ष असावे.
शुभ दिनांक - 5, 6, 8, 9.
 
मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746