26/11 च्या 14 वर्षांनंतर गुप्तहेर वार्तांकनाचे सध्याचे स्वरूप

कृतियोग्य गुप्तवार्ता हीच यशाची गुरुकिल्ली

    दिनांक :04-Dec-2022
|
राष्ट्ररक्षा
महासागरी धोके आणि कार्यपद्धती
महासागरी intelligence गुन्हेगारीची व्याख्या अशी करता येईल की, समुद्र वा नौकांशी संबंधित असलेले गुन्हे. ही गुन्हेगारी बहुतांश वेळा आंतर्देशीय असते. अनेक अधिकार क्षेत्रांचा अधिक्षेप करीत असतात. चाचेगिरी, अमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तस्करी, अवैध मासेमारी, समुद्री प्रदूषण, मानवी तस्करी इत्यादी गुन्हे महासागरी गुन्हेगारीत मोडतात. अमली पदार्थांची तस्करी रोखून छोट्या शस्त्रांचा प्रसार नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो. बांगलादेशासोबतची सागरी सीमा, शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांचा ओघ भारतात येणे सुकर करते. दोन अफू (हेरॉईन) पिकविणार्‍या देशांच्या मधात भारत वसलेला आहे. फक्त म्यानमारच वर्षाला 2360 टनांहून अधिक अफू पिकवतो. लगतच्या थायलंड आणि लाओसमध्येही हा रोग पसरला आहे. त्यामुळेच या भागास ‘सोनेरी त्रिकोण’ असे म्हटले जाते. म्यानमारमध्ये उत्पादित झालेली अफू रंगून किंवा मौलेनसारख्या शहरातून, इतर समुद्री बंदरांतून पाश्चात्त्य जगतात पाठविली जाते. मोठ्या प्रमाणात अफू पिकवणार्‍या दोन कुख्यात प्रदेशांदरम्यानचे भारताचे स्थान, पाश्चात्त्य देशांत अफू निर्यात करण्यादरम्यान मधला थांबा म्हणून सोयीचे ठरते. अफूचा व्यापारच दहशतवादी कारवायांच्या अर्थपुरवठ्याचा आधार असतो.
 

adkas; 
 
दाऊद इब्राहिम : भारतीय महासागरी दहशतवादी
intelligence : महासागरी दहशतवादाबद्दल बोलताना प्रत्येक भारतीयाच्या मनात येणारे पहिले नाव दाऊद इब्राहिमचे असते. महासागरी दहशतवादाशी संबंधित सर्व घडामोडींत त्याचा संबंध सिद्ध झालेला असूनही त्याला पाकिस्तानचा आश्रय लाभलेला आहे. पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांच्या अण्वस्त्र प्रसार कारवायांना सुविधा पुरवण्यात, शिवाय मार्च 1993 मधील मुंबईतील स्फोटांचा सूत्रधार म्हणून भूमिकाही त्याने निभावलेली होती. त्याचेपाशी असलेल्या प्रचंड निधीमुळे तो, सागरी दहशतवादी तयार करतो; ज्यामुळे सागरी तस्करी, चोरटा व्यापार फोफावत आहे. इब्राहिमची मंडळी (सिंडिकेट) मोठ्या प्रमाणातील इंग्लंड आणि पश्चिम युरोपात होत असलेल्या अमली पदार्थांच्या निर्यातीत गुंतलेली आहे. इब्राहिमने यशस्वीरीत्या प्रस्थापित केलेले मार्गच पुढे बिन लादेनने वापरले आहेत. केवळ सुरक्षात्मक कारवाया करून स्वतःचे रक्षण करण्यापेक्षा दाऊद इब्राहिम आणि त्यासारख्या समुद्री मार्गावर कारवाई करणारे तस्कर, दहशतवादी गट, बेकायदेशीर व्यापार करणारे यांच्या विरुद्ध आक्रमक कारवाई करण्याची गरज आहे.
 
 
पाकिस्तानच्या छुप्या आक्रमणाचा सर्वाधिक बळी भारतच
भारत पाकिस्तानच्या छुप्या intelligence आक्रमणाचा सर्वाधिक प्रभावित झालेला देश ठरला आहे. या युद्धात 9000 सुरक्षा दलातील सैनिकांसह सुमारे 70,000 लोक मारले गेले आहेत. जवळपास दोन दशके या आक्रमणांना सामोरे जाऊनही व्यूहरचनात्मक आणि डावपेचात्मक पातळीवर या धोक्याविरुद्ध राष्ट्रीय प्रतिसाद देण्यास भारत अयशस्वी ठरला आहे. एवढी प्रचंड हानी होऊनही पाकिस्तान भारतास रक्तबंबाळ करण्यासाठी जिहादींचा ओघ कायम ठेवू शकलेला आहे. त्यामुळे आपल्या तत्त्वप्रणालीचे (डॉक्ट्रीन) पुनर्निरीक्षण करणे गरजेचे आहे. शक्तिशाली जिहादी वहाबी विचारसरणीची वाढ, भारतास लक्ष्य मानणे या बाबी गंभीर आणि धोक्याच्या निदर्शक आहेत. भारतातील शेकडो मुस्लिम युवकांना प्रशिक्षित करून बंडखोर कारवाया करण्यास उद्युक्त केले जाते. गेल्या पाच वर्षांत 300 हून अधिक पाकिस्तानी आय. एस. आय. ची केंद्रे/सेल भारताच्या अंतर्भागातून खणून काढण्यात आलेली आहेत. याहून कितीतरी पटीने अधिक सेल कार्यरत आहेत. मोठ्या संख्येतील आय. एस. आय. प्रशिक्षित पाकिस्तानी युवक भारतीय नागरिक असल्याचे भासवून वेगवेगळ्या ठिकाणी लपले आहेत. मदरसा आणि इस्लामी संस्था मोठ्या संख्येने उगवत आहेत. तिरस्काराची व आपण वेगळे आहोत ही विचारसरणी किनारी भागांसह सीमा भागात पसरविली जात आहे. हे रोखण्याकरिता कल्पक उपाय अंमलात आणण्याची आवश्यकता आहे.
 
 
अनिवासी पाकिस्तानी व इतर इस्लामी माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञांना भारतविरोधात जिहादार्थी गोळा करणे
पाकिस्तान भारतापेक्षा माहिती तंत्रज्ञानात खूपच मागे आहे, तरीही संकेतस्थळ चोरी या बाबतीत तो मागे नाही. अनिवासी पाकिस्तानी व इतर इस्लामी माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञांना भारतविरोधातील इलेक्ट्रॉनिक मानसशास्त्रीय वॉरफेअर (electronic psychological warfare) करिता गोळा करण्यात ते फार पुढे आहेत. पाकिस्तानने एक संगणक प्रणाली भेदक (हॅकर) पथकच उभे केले आहे; ज्याचा उपयोग भारतीय आस्थापनांच्या त्रुटी शोधून त्यांचा वापर केला जातो. भारतीय intelligence गुप्तवार्तांकनाने ओळखण्याच्या खूप आधीच आय. एस. आय. ने विश्वव्यापी जालाचे (वर्ल्ड वाईड वेब) मानसशास्त्रीय युद्धातील सामर्थ्य ओळखले होते. आज हजारो जिहादी संकेतस्थळे अस्तित्वात आहेत. निरनिराळ्या देशांत जिहादी माहितीचा ते प्रसार करीत असतात. मुजाहिदीन कसे व्हावे, सुधारित स्फोटक साधने कशी तयार करावीत, शस्त्रास्त्रे व दारूगोळा कुठे खरेदी करता येईल, त्यांच्या किमती कशा असतात, दहशतवादावर हजारो लेखांचा संग्रह आणि निम्न प्रखरता लढाया व देशविरोधी प्रचार कसा करावा याचा मोठा संग्रह त्यांनी तयार केलेला आहे. अ‍ॅट्रिशनसारखे गट नियमितपणे जगभरातील 10 सर्वाधिक सक्रिय संगणक प्रणाली भेदक गटांची यादी प्रकाशित करीत असतात. स्वतःस जी-फोर्स-पाकिस्तान आणि पाकिस्तान-एच.सी. म्हणवणारे दोन पाकिस्तानी संगणक प्रणाली भेदकांचे गट या यादीत आहेत. त्यांच्या लक्ष्यांत भारतच नव्हे, तर अमेरिकाही आहे.
 
 
मुस्लिम ऑनलाईन सिंडिकेट (एम. ओ. एस.) हा तिसरा गट आहे. त्याने भारतातल्या 600 संकेतस्थळांना हॅक केल्याचा दावा केला आहे तसेच अनेक भारत सरकारच्या आणि खासगी संगणक प्रणालींचा ताबा मिळविल्याचाही दावा केलेला आहे. इतर अनेक पाकिस्तानी आणि इस्लामी संगणक प्रणाली भेदक गट क्रियाशील आहेत. त्यातील काही मालवेअर/व्हायरस वापराची शिकवणी देतात, संकेतस्थळांना हॅक करण्याचे शिक्षण देतात आणि दुष्प्रवृत्त संगणक प्रणालींचा (malicious software) पुरवठाही करीत असतात. सायबर स्पेस गुन्ह्यांकरिता पाश्चिमात्य कायदे अत्यंत कठोर असूनही ते खुल्यापणे ही वैध ऑनलाईन विध्वंसक कृत्ये करीत आहेत. भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. आपण आपले राष्ट्रीय सायबर सुरक्षा व्यवस्थापनाचे धोरण नीट राबविले पाहिजे; जेणेकरून त्या विषयांबाबतची कर्तव्ये स्वतंत्रपणे संबंधित दलांना नेमून देता येतील आणि तत्काळ प्रतिसादाकरिता यंत्रणा सिद्ध करता येईल. आपल्याला एक संघटना हवी आहे, जी संगणक प्रणाली भेदकांविरुद्ध आणि शत्रुदेशांविरुद्ध आक्रमक सायबर कार्यवाही अंमलात आणेल. सर क्रीक एरिया, रन ऑफ कच्छ, सुंदरबनच्या दलदली भागामधील intelligence गुन्हेगारीच्या कारवाया थांबविण्याची अत्यंत गरज आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा किनारपट्टीवर बांगलादेशकडून होणारी घुसखोरी थांबविली पाहिजे. सागरी सुरक्षेमध्ये सायबर हल्ल्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. आपल्यावर सायबर हल्ले झाल्यास प्रत्युत्तराची आक्रमक कारवाईसुद्धा केली गेली पाहिजे.
 
 
भारताभोवतीचे गुप्तहेरांचे जाळे (Breaking Intelligence Encirclement) भेदले पाहिजे
आय. एस. आय. ने भारतविरोधी हेरगिरीचे विध्वंसक आणि घातपाती जाळे नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, मध्यपूर्व इत्यादी भागांत विणले आहे. त्याद्वारे भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्या आधारे बहुआयामी छुपा हल्ला चढविता येऊ शकेल. गुन्हेगारी जगत (अंडरवर्ल्ड), शस्त्रास्त्र तस्कर, अमली पदार्थ मंडळी, खोट्या नोटा पसरवणारे, हवाला चालक, सीमावर्ती तस्कर इत्यादींशी संगनमत करून भारतास अस्थिर करण्यासाठी छुप्या युद्धाचे सामर्थ्य वाढविले जात आहे. भारताभोवतीचे हे intelligence गुप्तहेरांचे जाळे छुप्या आक्रमक उपायांनी भेदले पाहिजे.
 
 
बांगलादेशाकडून लोकसंख्यात्मक आक्रमणाने एक गंभीर सुरक्षा आयाम धारण केलेला आहे. किनारी भाग आणि द्वीप प्रदेशांना असलेला धोका तर खूपच गंभीर आहे. अवैध स्थलांतरे करणारे पाच ते सहा कोटींहून अधिक बांगलादेशी गंभीररीत्या प्रभावित झालेल्या आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यांतच सीमित राहिलेले नाहीत, तर ते देशाच्या कानाकोपर्‍यांत नवीन आश्रयस्थाने शोधत आहेत. बहुतेकांनी स्थानिक राजकीय आश्रयाने आणि भ्रष्ट अधिकार्‍यांच्या मनधरण्या करून ओळख पटवणारी कागदपत्रे प्राप्त केलेली आहेत. काही भागातील स्थानिक मुस्लिम व संस्था त्यांचे पुनर्वसन करीत आहेत. त्यांना शिधापत्रके, ओळखपत्रे, आश्रय, रोजगार आणि राजकीय आसरा मिळवून देण्यात मदत करीत आहेत. हे अवैध स्थलांतरित, दहशतवादासहित अनेक राष्ट्रविरोधी हालचालींकरिता आधारतळ आहेत. बांगलादेश सरकारने intelligence असा अहवाल दिला की, 3500 हून अधिक जमात-ए-इस्लामी, बांगलादेशचे दहशतवादी भारतात खुष्कीच्या आणि समुद्रमार्गाने घुसलेले आहेत. आता त्यांनी भारतात विशेषतः पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि केरळमध्ये स्थायिक झालेल्या बांगलादेशींमध्येच आश्रय मिळविलेला आहे. किनारी भागात स्थलांतरितांचा अतिरेक झाला असून त्यांना शोधून परत पाठविले पाहिजे.
 
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
9096701253
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)