आकाशात दिसणार 'हे' अद्भुत दृश्य...

    दिनांक :05-Dec-2022
|
नवी दिल्ली, 
पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी काही दिवस किंवा दिनांक खूप खास असतात. त्याचप्रमाणे (wondrous sky) जगभरातील अवकाश शास्त्रज्ञ 07 डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये अशा लोकांचाही समावेश आहे, ज्यांना खगोलीय घटनांचे साक्षीदार व्हायला आवडते. ज्याप्रमाणे जगभरातील लोक सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण पाहण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत असतात, त्याचप्रमाणे आता येणारे 7 दिवसही खूप महत्त्वाचे आहेत.

wondrous sky
 
ते इतके खास का आहे?
आपण ज्या पृथ्वीवर राहतो, ती पृथ्वी सूर्यमालेचा एक भाग आहे, हे आपल्याला माहीत आहे. आपण आपला उपग्रह चंद्र पृथ्वीवरूनच पाहू शकतो, परंतु इतर कोणताही ग्रह पाहणे सोपे नाही. या 7 डिसेंबर रोजी, कदाचित आपण (wondrous sky) पृथ्वीवरून इतर काही ग्रह पाहू शकणार आहोत. आश्चर्याची गोष्ट आहे,  पण येत्या 7 तारखेला सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि मंगळ एका सरळ रेषेत असतील. या दरम्यान चंद्रासोबत मंगळ सुद्धा पाहता येणार आहे. 
 
आपण मंगळ कसे पाहू शकाल?
मंगळ ग्रह पाहायच असेल तर,  योग्य तंत्र आणि योग्य वेळ पाळावी लागणार आहे. अमेरिकेच्या घड्याळातून, भारतात 8 डिसेंबरच्या रात्री 11.08 मिनिटांनी, आपण मंगळ ग्रह पाहू शकतो. या दरम्यान, (wondrous sky) आकाशाकडे पाहिल्यास एक केशरी-पिवळा तारा दिसेल. हा तारा सूर्यप्रकाशाने पिवळ्या किंवा केशरी रंगात चमकताना दिसेल. हा लाल ग्रह म्हणजेच मंगळ असेल. याशिवाय, व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रकल्पाच्या थेट प्रवाहादरम्यान,  ही सुंदर घटना तुम्ही पाहू शकता. शास्त्रज्ञांच्या मते, असा योगायोग 14 वर्षांनंतर पाहायला मिळणार आहे. या अद्भुत दृश्य अमेरिकेत सुमारे 2 मिनिटे दिसणार असून,  वेगवेगळ्या देशांसाठी त्याची वेळ वेगळी असणार आहे.