पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सूचना

    दिनांक :07-Dec-2022
|
मुंबई,
मृद व जलसंधारण विभागाने पाणलोट (CM Eknath Shinde) विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढेल, यासाठी प्रयत्न करावे. यासाठी विभागाचे बळकटीकरण आणि आर्थिक तरतूद यासाठी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाला पुन्हा गतिमान करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला. मृद व जलसंधारण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेत झाली. यावेळी ते बोलत होते.
 
CM Eknath Shinde
 
मुख्यमंत्री म्हणाले, मृद व जलसंधारण (CM Eknath Shinde) विभाग शेतकर्‍यांशी निगडित आहे. पाण्याची उपलब्धता, नियोजन आणि सिंचन सुविधा हा मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेण्यात यावी. यातून खात्रीशीर आणि मोठ्या क्षेत्रासाठी सिंचन क्षमता निर्माण होते. जलयुक्त शिवार अभियानातूनही मोठा फायदा झाल्याचे आढळून आले आहे. या अभियानाला गती देण्याचे नियोजन करता येईल. विभागाने उपलब्ध आर्थिक तरतूद वेळेत आणि दर्जेदार कामांसाठी खर्च होईल, यासाठी नियोजन करावे.
 
 
या (CM Eknath Shinde) बैठकीत जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे 1 लाख 3 हजार 834 संरचनाच्या योजनांमुळे अप्रत्यक्षरीत्या सुमारे 17 लाख 24 हजार 933 हेक्टर सिंचन क्षमता स्थापित झाल्याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.