कतारमध्येही मुख्यमंत्री शिंदेंची हवा

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा फोटो होतोय् व्हायरल

    दिनांक :07-Dec-2022
|
कतार/ मुंबई, 
सध्या जगभरतार फिफा फुटबॉल विश्वचषकाची धूम सुरू आहे. कोट्यवधी चाहते जहभरातून विश्वचषक सामन्यांचा आनंद घेत आहेत. काही चाहते थेट कतारमध्ये दाखल झाले आहेत. आता चर्चा होतेय् ती कतारमध्ये फुटबॉल स्टेडीयमवर झळकलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पोस्टरची... कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी (CM Shinde) शिंदे गटाची शिवसेना म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पोस्टर झळकावले आहे.
 
CM Shinde
 
शिंदे गटाचे नेते माजी आमदार राजेश क्षिरसागर यांनी या कार्यकर्त्यांचा फोटो शेअर केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. उद्धव ठाकरे गट आणि (CM Shinde) शिंदे गट या दोन गटांमध्ये तेव्हापासून शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाने भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात सरकार देखील स्थापन केले. ज्या वेगाने शिंदे-फडणवीस सरकार काम करत आहे, ते पाहता लोक त्यांची प्रशंसा करीत आहेत.