मुंबई,
कर्नाटकसोबतच्या सीमावादाशी (Devendra Fadnavis) संबंधित घडामोडींची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र-कर्नाटकमधील कित्येक दशकांपासून असलेला सीमावाद मागील काही दिवसांत चांगलाच भडकला आहे, या सीमावादावरील महाराष्ट्राची भूमिका शाह यांनी अत्यंत संयमाने ऐकून घेतली, असे (Devendra Fadnavis) फडणवीस यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत मंगळवारी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेची माहितीही फडणवीस यांनी अमित शाह यांना दिली आहे.