MPSC च्या थेट मुलाखतींचे निकाल जाहीर

    दिनांक :07-Dec-2022
|
मुंबई, 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (MPSC) विविध पदांच्या थेट मुलाखतीद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या पदांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. दि. 6 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित झालेल्या जाहिरातीस अनुसरुन करण्यात आलेल्या थेट भरतीचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

MPSC
 
दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी, नेत्ररुग्णालय, बृहन्मुंबई महानगरपालिका गट अ, दि. 19 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या वैज्ञानिक अधिकारी अन्न व औषध प्रशासन गट ब, दि. 12 आणि 13 ऑक्टोबर 2022, रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या सहायक आरोग्य अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका गट अ तसेच दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी, क्षय रोग चिकित्सा गट अ सार्वजनिक आरोग्य विभाग या विविध पदांचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.