PPF-सुकन्या समृद्धी लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

    दिनांक :07-Dec-2022
|
नवी दिल्ली,
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi) (SSY), PPF , किसान विकास पत्र (KVP) किंवा नॅशनल सेव्हिंग्स कार्ड (NSC) मध्ये भविष्याचा विचार करून गुंतवणूक करत असणाऱ्यांसाठी विशेष माहिती समोर अली आहे. सरकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना लवकरच फायदा मिळणार असून, याची घोषणा लवकरच अर्थमंत्री करणार आहेत.

(Sukanya Samriddhi)
 
माहितीनुसार, यावेळी डिसेंबरच्या अखेरीस अर्थ मंत्रालयाकडून छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात येणार आहे. सरकारकडून व्याजदरात वाढ केल्यानंतर अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. नवीन व्याजदर सरकार 1 जानेवारीपासून लागू करणार आहे. (Sukanya Samriddhi) चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी RBI ने पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. यावेळी मध्यवर्ती बँकेने रेपो दरात 35 बेसिस पॉईंट्सची वाढ केल्याने, तो 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
 
मे महिन्यापासून आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने पाच वेळा व्याजदरात २.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. मात्र त्यामुळे सरकारकडून अल्पबचत योजनेत कोणतीही वाढ झाली नाही. अशा परिस्थितीत, पुनरावलोकनाच्या आधारावर, नवीन व्याजदर 31 डिसेंबर किंवा त्यापूर्वी जाहीर केले जाणार आहेत. ते नवीन व्याजदर 1 जानेवारी 2023 पासून ते लागू केले जाईल. (Sukanya Samriddhi) व्याजदरात 60 ते 70 बेसिस पॉइंट्सने वाढ होण्याची शक्यता आहे.