बिपिन रावत यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी : डोवाल

    दिनांक :08-Dec-2022
|
- प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पुस्तकाचे प्रकाशन
- कार्यक्रमात विचार व्यक्त करताना अजित डोवाल
 
नवी दिल्ली, 
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) दिवंगत जनरल बिपिन रावत यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी होते. त्यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Ajit Doval अजित डोवाल यांनी केले. दिल्लीत जनरल रावत यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.
 

Ajit Doval- Rawat 
 
गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात वीरगती प्राप्त झालेले देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित डोवाल पुढे म्हणाले, जनरल बिपिन रावत यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान आहे. माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध होते. भारतीय सैन्य अधिकाधिक सामर्थ्यशाली कसे होईल आणि सैन्याच्या सर्वस्तरातील क्षमता कशा वाढतील, याकडे त्यांचे नेहमीच लक्ष होते. 2017 मध्ये जेव्हा चीनशी संबंध ताणले गेले होते तेव्हा आम्ही योजना आखून चर्चा करायचो. जनरल बिपीन रावत अतिशय कणखर बाण्याचे होते. ते दृढनिश्चियी होते. कुठल्याही परिस्थितीत आम्ही मागे हटणार नाही व सीमेवर ठामपणे उभे राहू आणि चीनला माघार घेण्यास भाग पाडू, अशी त्यांची कणखर भूमिका होती. अखेर 74-75 दिवसांच्या कठीण प्रसंगानंतर चीनने माघार घेतली, असे Ajit Doval अजित डोवाल यांनी सांगितले.