भारताच्या यजमानपदाखाली होणार

    दिनांक :08-Dec-2022
|
- श्रीलंका, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका

नवी दिल्ली, 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI (बीसीसीआय) गुरुवारी श्रीलंका, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मायभूमीवर होणार्‍या क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. यात तिन्ही स्वरूपाच्या क्रिकेटचा समावेश आहे. आगामी 2023 या नववर्षाच्या हंगमात भारतात 6 टी-20, 9 एकदिवसीय व 4 कसोटी सामने असतील. जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने हंगामाला सुरुवात होईल. मुंबई, पुणे व राजकोट येथे अनुक‘मे 3, 5 व 7 जानेवारी रोजी सामने खेळविले जातील, असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 
 
BCCI-LOGO
 
BCCI : त्यानंतर भारत व श्रीलंका यांच्यादरम्यान अनुक‘मे 10, 12 व 15 जानेवारी रोजी गुवाहाटी, कोलकाता व तिरुअनंतपुरम् येथे तीन वन-डे सामने होतील. त्यानंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे 18, 21 व 24 जानेवारी रोजी हैदराबाद, रायपूर व इंदूर येथे तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार असून हे सामने रांची, लखनौ व अहमदाबाद येथे अनुक‘मे 27, 29 जानेवारी व 1 फेब‘ुवारी रोजी होणार आहे.
 
 
 
BCCI : बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचा भारत दौरा 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होईल. त्यानंतर टीम इंडिया नवी दिल्ली (17 फेब्रुवारी), धर्मशाला (1 मार्च) व अहमदाबाद (9 मार्च) येथे पुढील तीन कसोटी सामने खेळेल. बॉर्डर-गावस्कर करंडकाची ही शेवटची आवृत्ती असेल व ही चार सामन्यांची कसोटी मालिका असेल. त्यानंतर दोन्ही संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमने-सामने उभे ठाकणार आहेत. त्यानंतर घरच्या हंगामाचा समारोप भारत व ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेने होणार आहे. या वन-डे मालिकेतील सामने मुंबई (17 मार्च), विशाखापट्टणम् (19 मार्च) व चेन्नई (22 मार्च) येथे होणार आहे.