दुचाकी चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

परतवाडा पोलिसांची यशस्वी कामगिरी

    दिनांक :08-Dec-2022
|
तभा वृत्तसेवा
अचलपूर, 
परतवाडा, अचलपूर Patrawada Police शहरासह जिल्हाभरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत असताना एका माहितीवरून पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत परतवाडा शहरातील अल्पवयीनांच्या दुचाकी चोरणार्‍या टोळीला जेरबंद करण्यास परतवाडा पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून 3 दुचाकींसह अनेक सुटे भाग जप्त करण्यात आले.
 
Patrawada Police
 
प्राप्त माहितीनुसार, Patrawada Police परतवाडा शहरातील आठवडी बाजार परिसरातून एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल 25 नोव्हेंबरला चोरी गेली होती. सदर दुचाकी मालकाने तक्रार दाखल केल्यावर घटनास्थळाचा पंचनामा करून त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून पोलिसांनी तपास आरंभ केला होता. मिळालेल्या फुटेजमध्ये एक अल्पवयीन मुलगा पार्किंगला लावलेली दुचाकी हळूहळू पुढे सरकवत नेत काही अंतरावर जाऊन दबा धरून बसलेल्या आपल्या साथीदारांजवळ नेऊन देतो व तिथून ते दोघे मोटर सायकल घेऊन फरार होतात, असे दिसल्यानंतर परतवाडा अंकुश गणेश दुरतकर वय 20 वर्ष राहणार साईनगर परतवाडा व पवन गजानन तनपुरे वय 19 वर्ष यांच्यासह इतर तीन अल्पवयीन मुलांचा यात सहभाग असल्याचे तपासांती निष्पन्न झाले.
 
 
पोलिसांनी अंकुश व पवनला ताब्यात घेऊन लपवलेल्या Patrawada Police तीन मोटरसायकल जप्त केल्या. आरोपी या चोरलेल्या वाहनांची विल्हेवाट हत्ती घाट जंगलात करत असत. एका खड्ड्यात पुरवून ठेवत असत व तेथील साहित्य एक एक करत अन्सार नगर निवासी इकबाल शेख याला विकत असत. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या शेख इकबालला देखील अटक करण्यात आली. आरोपीकडून खोडलेले नंबरचे तीन इंजिन, चार चेसिस, सायलेन्सर, पेट्रोल टाकी, बॅटरी, टायर असा एकूण तीन लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे .
 
 
ही कारवाई Patrawada Police ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या निर्देशावरून उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल नवगिरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, उप पोलिस निरीक्षक मनोज कदम, सचिन होले, रवींद्र बहोरिया, शफिक शेख, रमण हिवराळे, विवेक ठाकरे, सचिन कोकणे, मंगेश पाटील आदींनी केली आहे. दुचाकी चोरीच्या वाढलेल्या घटना जुळ्या शहरात डोकेदुखी ठरत असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईवर सर्वत्र अभिनंदन होत आहे.