तभा वृत्तसेवा
अमरावती,
भारतीय हवामान rain in Amravati विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार 12 आणि 13 डिसेंबरला जिल्ह्यात तुरळक, एक ते दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची अधिक शक्यता तर 9 ते 14 डिसेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहील.
याबाबत शेतकर्यांनी भाजीपाला व फळ पिकाची काढणी लवकर करून घ्यावी. परिपक्व अवस्थेतील पिकांची काढणी केलेली असल्यास माल सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून तडपत्रीच्या साहाय्याने झाकून ठेवावा. फळबाग व भाजीपाला पिकांना वाढीच्या अवस्थेनुसार आधार द्यावा. rain in Amravati कपाशी पिकामधील फुटलेल्या कापसाची त्वरित वेचणी करून घ्यावी तसेच वेचलेला कापूस सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा. ढगाळ आणि पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता असल्यामुळे उभ्या पिकामध्ये ओलीताची, खते व कीटकनाशक फवारणीची कामे टाळावीत. बाजार समित्यामधील उघड्यावर, वाळायला ठेवलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा, अशा अनेक सूचना हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या आहेत.