50 गावात लोकसंख्येनुसार बुद्ध विहार निर्मिती

पुतळ्याच्या स्मारकासह विस ठिकाणी अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार ः आ. गायकवाड

    दिनांक :08-Dec-2022
|
बुलढाणा, 
बुलढाणा नगर परिषदेला नागरी Buddha Vihar स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात नागरीसेवा व सुविधा पुरविणे या योजनेतून शहरात स्वंयचलित वाहतूक नियंत्रक बसविणे ,सरकारी तलाव परिसर विकास सौदर्यीकरण, नौकाविहार तसेच टिळक नाट्य मंडळाच्या खुल्या जागेत व्यावसायिकांना चौपाटी निर्मिती करणे, जैनमंदिर व गणराज नगर खुल्या जागेत बगीचा, शहरातील पुतळ्याच्या स्मारकासह वीस ठिकाणी आत्याधूनिक बुलेट कॅमेरे बसविणे शिवाय बाजीप्रभू देशपांडे स्मारक विस्कळीत करून लोकसंख्येच्या निकषावर 50 ठिकाणी बुद्धविहार, रस्ता मजबुती व इतर विकास कामासाठी 10 कोटी रूपये मंजूरीचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांना सादर केल्याची माहिती आ. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
 
Buddha Vihar
 
आज दि. 8 रोजी दुपारी शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख ओम सिंग राजपूत उपस्थित होते. आ. संजय गायकवाड यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागरी सेवा सुविधा योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये Buddha Vihar बुलढाणा शहरात स्वयंचलित वाहतुक नियंत्रण बसविणे करीता 1 कोटी 60 लाख रू., शहरातील धाडरोडवरील क्षय आरोग्य धाम समोरील सरकारी तलाव परिसर विकास व सौदर्यीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविणे, रंगीत कारंजे, नौकाविहार परिसरात विद्युतीकरण करून आकर्षण रोषणाई प्राकृतिक प्राणी शिल्प बसविणे याकरीता 2 कोटी 50लाख रू, शहरातील प्रभाग क्र 8 मध्ये विद्युत पोल उभारणे पथदिवे लावणे करीता 10 लाख रू, शहरातील प्रभाग क्र 2 मध्ये खुल्या भूंखडावर बगीचा विकसीत करणे करीता 50 लाख रू, शहरातील प्रभाग क्र 11 मध्ये टिळक नाट्य क्रिडा मंडळाजवळील खुल्या जागेत पार्किग तसेच फुड स्टॉलची निर्मिती करणे 1 कोटी रू, जैन मंदिरासमोरील खुल्या भूूखंडात बगीच्या विकसीत करणे व हायमास्ट बसविणे करीता 30 लाख रू, विविध प्रभागात सोलर हायमास्ट बसविणे करीता 1 कोटी रू, प्रभाग क्र 8 मध्ये गणराज नगर येथील खुल्या जागेत बगीच्या विकसीत करणे 10 लाख रू, शहरातील प्रभाग क्र.2 मध्ये उर्दू शाळेच्या पाण्याच्या टाकीला पॅराफिट वॉल व तार चेयनिंग करणे 20 लाख रू, बुलढाणा शहर विविध पुतळ्याजवळ स्मारकांसह शहरातील महत्वाच्या ठिकाणी व शहरामध्ये मलकापूर रोड वरील प्रवेशद्वार, चिखली रोड वरील प्रवेश द्वार व इतर ठिकाणावरील प्रवेश द्वार सह आत्याधुनिक बुलेट कॅमेरे बसविणे 2 कोटी रू, शहरातील विविध ठिकाणचे खुल्या भूखंडावर डिजीटल कमानी सह विकसीत करणे 30 लाख रूपये, बाजीप्रभू देशपांडे स्मारक विकसीत करणे 30लाख रू, शहरातील शारदा कॉन्हेंट ते एडेड हायस्कूल पर्यंत रस्ता मजबुती करण व Buddha Vihar काँक्रिटी करण करीता 10 लाख रू. अशी एकूण 10 कोटी रूपयांची मागणी विविध विकास कामासाठी करण्यात आल्याचे आ. संजय गायकवाड यांनी सांगितले.