औरंगाबाद,
आधीच अतिवृष्टीमुळे Crops hit खरिपाचे पीक वाहून गेले; त्यातून सावरत शेतकर्यांनी रबीची पेरणी केली. पीक बहरले आहे. मात्र, गत चार-पाच दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण असल्यामुळे रबी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. औरंगाबाद, पैठण, सिल्लोेड, फुलंब्री, सोयगाव, कन्नड, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील परिसरात यंदा परतीच्या पावसाने कहर केला. अतिवृष्टीमुळे अनेकांचे खरीप पीक पूर्णपणे वाया गेले आहे. यामुळे मराठवाड्यातील पाणी पातळी वाढली. विहिरींमधील पाणीसाठासुद्धा वाढला.
Crops hit खरिपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकर्यांनी रबीची तयारी केली. अनेक ठिकाणी कपाशीची झाडे उपटून टाकली. त्या कपाशीच्या शेतामध्ये मका, ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांचा पेरा घेतला. पण आता ढगाळ वातावरणाने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातावरण, धुके, पिकांवरील रोगराई यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकर्यांनी ढगाळ वातावरणामुळे गव्हाची पेरणीही टाळली आहे. काहींनी गव्हाऐवजी हरभर्याला व जनावरांना खाण्यासाठी चारा म्हणून शाळूला प्राधान्य दिले आहे. मात्र आता ढगाळ वातावरण, रोगराईमुळे पिकांना फटका बसणार असल्याची भीती निर्माण झाली असून मराठवाडा व विदर्भासह उत्तर महाराष्ट्राला याचा Crops hit फटका बसला आहे. कापूस, सोयाबीनसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या उत्पादनात घट आली आहे.