सेहवाग, प्रसादची भारताच्या कालबाह्य दृष्टिकोनावर टीका

    दिनांक :08-Dec-2022
|
नवी दिल्ली, 
बांगलादेशमध्ये भारतीय क्रिकेट संघाने वन-डे मालिका गमावल्यानंतर माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि व्यंकटेश प्रसाद यांनी भारताच्या कालबाह्य दृष्टिकोनावर टीका केली आहे. Indian teams भारती संघ व्यवस्थापनाने गंभीरपणे विचार करावा, असे प्रसादने म्हटले, तर सेहवागने रोहित शर्मा व कंपनीला जागे होण्याचे आवाहन केले. आमची कामगिरी कि‘प्टोपेक्षा वेगाने घसरत आहे. मरगळ झटकून टाकण्याची गरज आहे, असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.
 
 
sahawag
 
याआधी पावसाच्या अडथळ्यात झालेल्या वन-डे मालिकेत भारताचा न्यूझीलंडकडून 0-1 असा पराभव झाला होता. स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या Indian teams भारतीय संघाने फलंदाजी व गोलंदाजीचे वाईट प्रदर्शन केले. 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताने आयसीसीचे मोठे विजेतेपद जिंकलेले नाही हे प्रसादने पुन्हा एकदा अधोरेखित केले. जगभरात भारतीय संघ नवनवीन प्रयोग करीत आहे, परंतु जेव्हा मर्यादित षटकांचे कि‘केट खेळण्याचा विचार येतो, तेव्हा आमचा दृष्टीकोन एक दशक जुना आहे, असे प्रसादने आपल्या ट्विटमध्ये लिहिले.
 
 
2015 च्या विश्वचषकातील पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यानंतर इंग्लंडने कठीण आव्हाने स्वीकारली व मुसंडी मारली. त्याचप्रमाणे भारताला कठोर आव्हान स्वीकारण्याची गरज आहे. Indian teams भारतीय संघाने दृष्टिकोनात आमूलाग‘ बदल करण्याची गरज आहे, असेही तो म्हणाला. शनिवारी चट्टोग्राम येथे होणार्‍या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ सांत्वनात्मक विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल.